यवतमाळ सामाजिक

साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

यवतमाळ सत्यशोधक विद्याठात आयोजन

बॉक्स
डॉ. लीला भेले यांना जीवन गौरव तर जोहरा कांबळे यांना समर्पण पुरस्कार

साहित्य व सांस्कृतिक अकादमी व इंटरनॅशनल लिटरेचर अँड कल्चरर अकॅडमी दिल्लीतर्फे दिले जाणारे राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरीय पुरस्कार आज जाहीर करण्यात आले.
या पुरस्कारामध्ये प्रसिद्ध समाजसेविका तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लीला भेले यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला तर सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्या व अनाथांची आई म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या विदर्भातील जोहरा कांबळे यांना समर्पण पुरस्कार जाहीर झाला. पुणे येथे संपन्न झालेल्या अकादमीच्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आली.
साहित्य व सांस्कृतिक अकादमी पुणे व दिल्लीतर्फे 2008 पासून विविध क्षेत्रांमध्ये अविरतपणे कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येते. यावेळी हा पुरस्कार वितरण सोहळा यवतमाळ येथील सत्यशोधक विद्यापीठामध्ये दिनांक 6 नोव्हेंबर ला संपन्न होणार आहे.
या जाहीर झालेल्या पुरस्कारामध्ये वैभव वाळवी सोलापूर, प्रवीण कोळंबे ठाणे, डॉ.चंद्रशेखर भारती मुंबई, एच आर उद्योग समूह विदर्भ झोन, प्रो. सुषमा यादव दिल्ली, प्रतिभा पाटील पुणे, राजू मुलानी पंढरपूर, प्रदीप झाडे यवतमाळ, प्रा. डॉक्टर सुनील विभुते सोलापूर इत्यादीं सोबतच अशोक पोले, बोधिसत्व खंडेराव, माधुरी आडे, प्रमोद डेरे, सोनाली गुजर, उमेश निमकर, डॉ. युवराज मानकर, मनोहर बोभाटे, जावेद अन्सारी, अशोक वानखडे, सीमा मुंगिनवार, डॉ. ज्ञानेश्वर गोरे व माया गोरे व पवन थोटे यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
या पुरस्कार सोहळ्याला विदर्भातील आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक हजेरी लावणार आहे.तसेच सामाजिक कार्यकर्ते सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपले विचार व्यक्त करणार आहेत.
असे साहित्य सांस्कृतिक अकादमी पुणे च्या संचालिका प्रिया वाकडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Copyright ©