यवतमाळ सामाजिक

लीळा चरित्र ग्रंथ दिंडी व भव्य शोभायात्राचे आयोजन

लीळा चरित्र ग्रंथ दिंडी व भव्य शोभायात्राचे आयोजन

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतरण वर्ष अष्टशताब्दी महोत्सवानिमित्त भव्य लीळाचरित्र ग्रंथ दिंडी व भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात येत आहे हि शोभा यात्रा 11 ऑक्टोंबर 22 ला सकाळी काढण्यात येणार आहे या कार्यक्रमानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमात सर्वप्रथम देवाचे संबंधित मूर्तीस मंगलस्नान व वीडा अवसर परम पूज्य श्री आचार्य प्रवर कवीश्वर कुलभूषण लाड बाबा हरसुल यांच्या पिढीतील महत्त्वपूर्ण प्रसाद वंदन देवपूजा व ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे ही ग्रंथ दिंडी गोपाळ नगर श्री प्रमोद भाऊ गोटे यांच्या निवासस्थानापासून निघेल तर निधी मंगल कार्यालय दारव्हा येथे या रॅलीचा समोर रोप करण्यात येणार आहे या ग्रंथ दिंडीत श्री दत्त मंडळ जांभोरा श्री चक्रधर महिला भजनी मंडळ जांबोरा,श्री दत्त भजनी मंडळ ब्राम्ही श्री दत्त भजनी मंडळ पिंपळगाव डुबा संत सेवालाल हरिपाठ मंडळ पिंपळगाव डुबा श्रीकृष्ण महिला भजनी मंडळ कोटंबा श्रीकृष्ण मंदिर प्रबोधन मंडळ सुकळी इत्यादी मंडळांचा या रॅलीमध्ये सहभाग असून यावेळी ज्ञान सत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी सभा अध्यक्ष म्हणून परमपूज्य श्री आचार्य प्रवर कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा महानुभाव राजापेठ अमरावती मुख्य उपस्थिती परमपूज्य महंत श्री आचार्य प्रवर कवीश्वर कुलभूषण लाडबाबा हरसुल सभामंडपाचे उद्घाटन परमपूज्य महंत श्री गोविंदराज बाबा रिद्धपूरकर जवळा खांड प्रमुख मार्गदर्शक परमपूज्य महंत श्री विनय मुनी उपाध्ये वैरागी बाबा पंजाबी अध्यक्ष अमरावती जिल्हा ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ अमरावती प्रमुख अतिथी परमपूज्य महंत श्री वैद्यराज बाबा आराध्य प पू. प. म. श्री चक्रपाणि बाबा करंजकर श्री प.पू. प.म.केशवराज बाबा कारंजेकर श्री नेवासकर बाबा व प. पु प म श्री संत राज बाबा कोल्हेकर
प.पू.ई केशव मुनी दादा अमृते व प. पु ई.श्री जनार्दन दादा कारंजेकर पप्पू श्री गोवर्धन दादा वनवले इत्यादी संत महंत या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परम सेवक कीर्तनाचार्य दादारावजी पिंपळगावकर हे करणार आहे यावेळी प्रमुख ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ओकार चेके हे उपस्थित राहणार आहे तरी जिल्ह्यातील समस्त महानुभाव पंथीय सदभक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक महानुभव मंडळांनी केले आहे

Copyright ©