यवतमाळ सामाजिक

ग्रामीण पोलिसांची चोरीतील गुन्हेगारावर कारवाई

ग्रामीण पोलिसांची चोरीतील गुन्हेगारावर कारवाई

यवतमाळ ग्रामीणपोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रुई वाई येथील फिर्यादी गजानन मानकर यांनी 27 सप्टेंबर 22 ला तक्रार दाखल केली होती की घरातील लोखंडी अलमारी मधील 18000 रुपये किमतीचा जिओ मोबाईल व शेजारी राहणारे स्वप्निल डहाके यांची मोटरसायकल हिरो होंडा पॅशन प्लस क्रमांक एम एच 29 एस 61 19 किंमत 15000 रुपये तसेच अथर अली काजी यांचे घरून ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण 36 हजार रुपये चा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला याप्रकरणी तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला तांत्रिक तपास सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक बाबी तपास केल्याने सदर गुन्ह्यातील आरोपी जीवन कडू चव्हाण व 28 वर्ष व सलीम खान बशीर खान वय 32 वर्ष या दोन्ही आरोपींना शकलगाव पोलीस स्टेशन आर्णी यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून गुन्हा मधून चोरी केलेला मोबाईल दोन मोटरसायकल हस्तगत करण्यात आले तसेच सदर आरोपींनी पोलीस स्टेशन परवा आणि माहूर हद्दीची सुद्धा चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे आणखी तपासात अनेक गुन्हे समोर येण्याची शक्कता वर्तविण्यात आली असून सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे उपविभागी पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या नेतृत्वात बीड जमादार कैलास लोथें गजानन गोडांबे संदीप मेत्रे यांनी ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.

Copyright ©