यवतमाळ सामाजिक

घाटंजी येतील आशिष माडूरवार यांची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा करिता निवड करण्यात आले

तालुका प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार

घाटंजी येतील आशिष माडूरवार यांची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा करिता निवड करण्यात आले

घाटंजी:ऑक्टोबर महिन्या मध्ये आशिया खंडातील सर्वांत मानाचा समजला जाणारा चित्रपट महोत्सव म्हणजे “बुसान आंतर्राष्ट्रीय चित्रपट महोत्सव” होतोय. हा चित्रपट महोत्सव दर वर्षी “प्लॅटफॉर्म बुसान” नावाचा अत्यंत महत्वाकांक्षी असा प्रोग्रॅम घेतो.

प्लॅटफॉर्म बुसान हा आशिया खंडातील निवडक फिल्म मेकर्स ना एकत्र आणून त्यांना आंतरराष्ट्रीय नेटवर्किंग आणि कोलॅबोरेशन ची संधी तसेच जगप्रसिद्ध फिल्ममेकर्स चे मार्गदर्शन उपलब्ध करून देतो. ह्या प्रोग्रॅम साठी संपूर्ण आशिया खंडातून काही मोजकेच फिल्ममेकर्स त्यांच्या गुणवत्ते च्या निकषावर निवडले जातात.

ह्या अत्यंत मानाच्या अशा प्रोग्राम साठी घाटंजी च्या आशिष माडूरवार यांची यंदा निवड झाली आहे. आशिष हा भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थान मधून पदवीप्राप्त फिल्ममेकर असून ह्या आधी हि तो काही मानांकित लॅब्स जशा कि, क्योटो फिल्ममेकर लॅब (जापान), सनडान्स कोलॅब व्हिजुअल स्टोरीटेलिंग प्रोग्राम (अमेरिका) तथा NAFF फॅनटॅस्टिक फिल्म स्कूल (साऊथ कोरिया) इत्यादी चा भाग राहिलेला आहे. नुकतीच त्याने “थोडी सी ख़ुशी” हि एक शॉर्ट फिल्म केली असून ती चक्क २० आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गाजली आहे.

आता ह्या “प्लॅटफॉर्म बुसान” च्या निमित्ताने आशिष साऊथ कोरिया च्या बुसान ची वारी करणार असून तिथे आपल्या नियोजित “हिरण्यकशिपू”, ह्या चित्रपटासाठी आंतराष्ट्रीय कोलॅबोरेशन शोधण्या चा प्रयत्न करणार आहे.

हिरण्यकशिपू ह्या त्याच्या चित्रपटावर तो गेली २ वर्षे झपाटून काम करत असून तो घाटंजी आणि त्या भोवतालच्या निसर्गरम्य परिसरात च चित्रित होणार आहे. कोरोना च्या दुसऱ्या लाटेत काहीसा लांबणीवर गेलेला हा चित्रपट पूर्ण करण्याचे आशिष चे स्वप्न असून सदर चित्रपटाची निवड महाराष्ट्र शासनाने फिल्मसिटी मुंबई व एन एफ डी सी सोबत मिळून घेतलेल्या अत्यंत मानाच्या अशा स्क्रिप्ट लॅब साठी सुद्धा झाली होती. निर्मिती पूर्वीच हा चित्रपट मान्यवरांच्या नजरेत येत असून त्याचे भविष्य उज्ज्वल ठरत आहे.

Copyright ©