यवतमाळ सामाजिक

सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम व वेशभूषा स्पर्धा भाजपा महिला आघाडी तर्फे आयोजित करण्यात आले

तालुका प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार

सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम व वेशभूषा स्पर्धा भाजपा महिला आघाडी तर्फे आयोजित करण्यात आले

घाटंजी येथील पालतेवार कृषी केंद्राच्या वरती माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम व वेशभूषा स्पर्धा भाजपा महिला आघाडी तालुका व शहर तर्फे आयोजित करण्यात आली होती.या कार्यक्रमात वैश्य समाजाच्या अध्यक्षा व भाजपा शहर महिला मोर्चा सरचिटणीस सौ.साधनाताई किशोर माडुरवार व भाजपा शहर उपाध्यक्षा सौ.राधिका गुंडावार यांनी विशेष सहभाग घेतला.याच वेळी व त्यांच्याकडून भाजपा शहर महिला अध्यक्षा सौ.रिनाताई धनरे यांचा कौतुकास्पद सत्कार करण्यात आला.होत्तसेच हा कार्यक्रम सौ.प्रितीताई तायडे,श्री.करणेवार सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी वैश्य समाजातील महिलांनी सक्रिय सहभाग घेऊन वेशभूषा स्पर्धा घेतली.त्यात विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली.या विषेश प्रसंगी सर्व स्तरातील महिला उपस्थित होत्या.

Copyright ©