यवतमाळ सामाजिक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, दिग्रस नगर विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, दिग्रस नगर विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दिग्रस शाखेचा शस्त्र पुजन व विजयादशमी कार्यक्रम हा रविवार दिनांक ९ ऑक्टोबरला ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

विजयादशमी उत्सवा निमित्त सायंकाळी ५ वाजता स्वयंसेवकाचे पथ संचलन नियोजित मार्गाने निघणार असून हे पथसंचलन डॉ भास्करवार प्रांगणातून निघेल त्यानंतर सायंकाळी ६.१५ ला भास्करवार ले आऊट येथे पुढील कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी  परमपूज्य महंत श्री. लाडबाबा महानुभाव (अध्यक्ष-श्री दत्त संस्थान, हरसुल) व प्रमुख वक्ते मा. श्री. आनंदीदास पाळेकर (समरसता गतिविधी, सहसंयोजक विदर्भ प्रांत) यांचे उपस्थितीत संपन्न होत आहे. या कार्यक्रमास सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन नगर कार्यवाह मनोज अस्वार यांनी केले.

Copyright ©