यवतमाळ सामाजिक

दिग्रस येथील दुर्गामाता दौड ला नागरिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिग्रस येथील दुर्गामाता दौड ला नागरिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचा भक्तिमय उपक्रम

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे गत ३५ वर्षापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात श्री दुर्गा माता दौड आयोजित केली जाते. एक सशक्त संस्कारी स्वाभिमानी धर्म-अभिमानी निर्व्यसनी तरुण पिढी निर्माण करण्यासाठी व भारत मातेची सर्व मुले चांगली घडावी यासाठी श्री शिव्रतिष्ठान हिंदुस्तान तर्फे ही दौड आयोजित केली जाते. या दुर्गामाता दौडला संपूर्ण महाष्ट्रात उत्स्फुत प्रतिसाद मिळत आहे. दिग्रस शहरात गेल्या दोन वर्षापासून दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. दुर्गामाता दौड साठी शहरातील विविध भागातील मुले-मुली श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रोज सकाळी ५:३० वाजता उपस्थित राहून श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करुन ठिक ६ वाजता दौड ला सुरुवात करून शहरातील वेगवेगळ्या भागातील दुर्गा माता मंडळ ठिकाणी जाऊन श्री पूजन करुन जय अंबे चा जय जय करीत वातावरण भक्तिमय होऊन जायचे. दुर्गामाता दौड मधील ध्वजपूजन करण्यासाठी रस्त्यावर रांगोळी काढून दुर्गा माता दौड चे स्वागत केले जात होते. सकाळी सुंदर धार्मिक व सात्विक वातावरण दौडच्या माध्यमातून दिसून येत होते. दुर्गामाता दौड दररोज शहरातील वेगवेगळ्या मंदिरात जाऊन आरती करून प्रतिष्ठानची राष्ट्ररक्षणाची सामूहिक शपथ घेऊन समाजाला जवळ करण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण मुले मुली यात सहभागी होत होती. समोर जरीपटका भगवा ध्वज सर्वांच्या डोक्यावर वारकरी टोपी व फेटे असे या दुर्गामाता दौड चे स्वरूप होते भगव्या ध्वजाच्या नेतृत्वात भारत मातेचा व महापुरुषांचा जयजयकार करीत ही दुर्गामाता दौड शहरातील विविध भागातून संचलन करित असताना ध्वज पूजन करण्यासाठीं सकाळी दिग्रसकरांची गर्दी दिसून येत होती.

Copyright ©