यवतमाळ सामाजिक

दिग्रसचे ग्राम दैवत श्री.संत घंटीबाबाचां ७७ वा,पुण्यतिथी महोत्सव व यात्रा

दिग्रसचे ग्राम दैवत श्री.संत घंटीबाबाचां ७७ वा,पुण्यतिथी महोत्सव व यात्रा

भरगच्च क्रार्यक्रमांचे आयोजन

दिग्रस शहराचे ग्रामदैवत्,सर्वधर्मीयांचे श्रधास्थान, महान तपस्वी सदगुरु श्री.संत घंटीबाबा यांचा ७७ वा.पुण्यतिथी महोत्सव व भव्य यात्रेचे आयोजन श्री.घंटीबाबा संस्थान,विविध सामाजीक संस्था यांचे संयुक्त सहभागातुण दि.७आँक्टो-२२ ते दि.१९ आँक्टो-२२ पर्यत भव्य स्वरुपात करण्यात आले असुण ,या निमीत विवीध धार्मीक,सामाजीक,प्रबोधनात्मक ,आरोग्य विषयक ,मंनोरंजनात्मक भरगच्च कार्यक्रमाचे संस्थानचे वतीने आयोजन व नियोजन करण्यात आले आहे.श्री.घंटीबाबाचां पुण्यतिथी महोत्सव व या निमीत भरणारी यात्रा संपुर्ण यवतमाळ जिल्हयात प्रसिध्द आहे. दि.५ आँक्टोला दसरात्सव, दि.७आँक्टो.ला सकाळी ७-३० वा.बाबांचे पादुकांचे पुजन, दि.७ते १३ आँक्टो.ला भागवतकार ह.भ.प.श्री.विशाल महाराज यांचे सुश्राव्य वाणीतुण,श्रीमद भागवत कथा, दि.८ आँक्टो.ला सकाळी १०ते दु.१ वा.पर्यत भव्य निशुल्क होमीओपँथीक तपासणी व उपचार शिबीर यात होमीओपँथीक तज्ञ डाँ.अभय गोवींदवार व डाँ. श्रीराम विणकर हे रुग्णांची तपासणी करतील.दि.९ आँक्टोला सुप्रसिध्द किर्तणकार ह.भ.प.श्री.सत्यपाल महाराज सप्तखंजेरीवादक यांचे किर्तण होईल.दि.१० आँक्टो.ला रात्री ८-३० वा.विनोदी वर्राडी कवी संमेलन होईल,यात स्थानीक नामवंत कलावंताची उपस्थीती राहील.दि.११ आँक्टो.ला राष्ट्रीय किर्तीचे किर्तणकार ह.भ.प.श्री.नारायण महाराज पडोळे यांचे किर्तणाचा कार्यक्रम होईल.दि.१२आँक्टो.ला निशुल्क स्त्रिरोग निदाण शिबीर होईल.यांत तज्ञ डाँ. श्याम जाधव व डाँ. कल्पना जाधव हे रुग्णांची तपासणी करतील .संत रामराव महाराज आरोग्यधाम हाँस्पीटल दिग्रस यांचे सहयोगातुण हे शिबीर होईल.दि.१३आँक्टो.ला सकाळी १०ते १२ पर्यत, निशुल्क दंत रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आसुण यांत दंतरोग तज्ञ,डॉ. सचीन अग्रवाल,डॉ. वंदना छताणी,डॉ. सुरेंद्र राऊत,डाँ. सिध्धांत जाधव,डॉ. नुजाहत आवेश पटेल हे रुग्णांची तपासणी करतील.दि.१४आँक्टो.ला संत रामराव महाराज आरोग्य धाम हाँस्पीटल व संस्थान चे संयुक्त विध्यमाने ,सकाळी ११ ते दु.२ पर्यत आरोग्यधाम हाँस्पीटल येथे निशुल्क नेत्ररोग तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले असुण यांत नेत्ररोग तज्ञ,डॉ. अभय पाटील हे रुग्णांची तपासणी करतील.दि.१५ ला.भव्य विनोदी हिंदी कवीसंमेलनाचे आयोजन रात्री ८ वा.यात देशातील ख्यातनम कवी, किरण जोशी अमरावती, माधुरी किरण बालाघाट,देवेंद्र परीहार मुंगेली छतीशगढ,कपील जैन दिग्रस हे हजेरी लावणार आहे.दि.१६ ला, संत रामराव महाराज आरोग्य धाम हाँस्पीटल व संस्थान यांचे संयुक्त विधमाने भव्य हद्रयरोग तपासणी व निदान शिबीराचे निशुल्क आयोजन करण्यात आले असुण यांत हद्रयरोग तज्ञ,डॉ. आशीष शेजपाल हे रुग्णांची तपासणी करतील. दि.१७ आँक्टो.ला खास दिग्रसकर रसीकांनसाठी म्युझिक क्लब दिग्रस यांचा गीत संगीत रजनीचा कार्यक्रम होईल.दि.१८ रोजी,श्री.चे प्रतीमा व पादुकांची पालखी परंपरागत् पालखी मार्गाने पालखी मिरवणुक निघेल, पालखीचा समारोप बाबांचे मंदीरात ह.भ.प.श्री.महादेवराव महाराज माहुरे यांचे काल्याचे किर्तणाने होईल या निमीत व्यसणमुक्ती सम्राट ,दिग्रस भुषण ह.भ.प.श्री.मधुकरमहाराज खोडे यांचे हस्ते दहीहांडी व काल्याचा प्रसाद होईल.दि.१९आँक्टो.ला सकाळी ११ ते दु.२ पर्यत महाप्रसाद राहील. महाप्रसादाने यंदाचे महोत्सवाचा समारोप होईल. सर्व कार्यक्रम व महाप्रसाद मंदीरा लगतच्या भव्य मंडपात होईल. तरी दिग्रस व परीसरातील भावीकांनी या सर्वकार्यक्रमांचा लाभ घ्यावा.असे आव्हाण संस्थानचे सचीव,डॉ. प्रदीप मेहता यांनी केले आहे.

Copyright ©