Breaking News यवतमाळ सामाजिक

*वीज पडल्याने तरुण शेतकरी गंभीर*

प्रतिनिधी : धीरज शेरकर
शेतात वीज पडल्याने शेतकरी गंभीर झाल्याची घटना वाटखेड येथे घडली असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सवि असे की
यवतमाळ तालुक्या अंतर्गत हिवरी पासुन तीन की.मी.अंतरावरील असलेल्या वाटखेड येथील शेतकरी अल्लाशिर रमजान अली कोठडीया वय ४५ रा.शहीद सोसायटी यवतमाळ हे नेहमी प्रमाणे सकाळी ६ वाजता पासुन सायकाळी ६ ते ७ वाजे पर्यंत शेतात काम करत असताना ६ ऑक्टोंबर ला सायंकाळी ६.४५ वाजता विजेचा कडकडाट होऊन वीज कोसळली यात अल्लासिर यांना विजेची आस लागल्याने उजव्या बाजूने शरीर पुर्णतः भाजून गेले तर खिशात असलेला मोबाईल पुर्णतः फुटून त्याचे तुकडे झाले , या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटना स्थळा कडे धाव घेतली अल्लासिर हे एकटेच शेतात असल्याने जवळपास पाऊंतास जागेवरच तडपडत होते, वाटखेड येथील अमृत झामरे यांचे कडे आपली मोटर सायकल ठेऊन शेतात जात असल्याने झामरे यांच्या लक्षात आले की अल्लासिर यांना यायला वेळ का लागला यांना संशय आल्या मुळे अमृत यांनी शेतात धाव घेतली तर अल्लसिर यांचेवर वीज पडल्याने याचे शरीर जळाल्याचे पाहून हे तडपडत आहे अमृत यांनी पुन्हा गावाकडे धाव घेऊन गावातली अनेकांना सोबत घेत अल्लासीर यांना उचलून रुग्ण वाहिकेने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती चांगली असून उपचार सुरू आहे .

Copyright ©