यवतमाळ सामाजिक

नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने गरजू महिलांना साड्यांचे वाटप.

नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने गरजू महिलांना साड्यांचे वाटप.

यवतमाळ शहरातील वसुंधरा फाउंडेशन विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनसेवा तसेच महिलांसाठी विशेष कार्य करत असून यानिमित्ताने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आठवडी बाजार परिसरातील हिंदुस्तानी दुर्गादेवी उत्सव मंडळ या ठिकाणी गरजवंत महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. देशातला दुसऱ्या क्रमांकाचा दुर्गोत्सव म्हणून यवतमाळचा दुर्गोत्सव ओळखला जातो. या उत्सवाला १०० वर्षांची परंपरा लाभली आहे. या परंपरेत मानाचा तुरा खोवण्याचे काम दुर्गोत्सव मंडळांच्या देखाव्ये तयार करतात.मागील दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे हव्या त्या प्रमाणामध्ये दुर्गोत्सव साजरा करता आला नाही, मात्र कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर यावर्षी मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सवाचा उत्साह संचारला आहे. या नवरोत्सवानिमित्त तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी स्वच्छता बाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी कोठेवार यांनी केले.या स्तुस्य उपक्रमासाठी तारपुरा परिसरातील अंगणवाडी सेविका अंबालिका पांडे यांनी पुढाकार घेतला असून या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा वर्षा पडवे,सचिव प्रिया गायनर, स्मिता ढेकळे,शिल्पा मस्के, माधुरी कोटेवार,सुचिता नागोसे, जया सलुजा (रिलायन्स फाउंडेशन),अर्पिता पोहनकर वर्षा लोखंडे,जया बोबडे,निर्मला आडे यांनी सहकार्य केले.

Copyright ©