यवतमाळ सामाजिक

दिग्रस येथे ग्राम स्वच्छतेद्वारे स्वच्छता पंधरवाडयाचा समारोप

दिग्रस येथे ग्राम स्वच्छतेद्वारे स्वच्छता पंधरवाडयाचा समारोप

नगरपालिका सह विविध विभागांचा पुढाकार,
महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त राबविला उपक्रम

दिग्रस नगर पालिका मुख्याधिकारी सुधाकर राठोड यांच्या वतीने ग्राम स्वच्छता अभियान राबवून काल दि. २ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वच्छता पंढवड्याचा समारोप करण्यात आला. यावेळी विविध राजकीय पक्ष , स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी , शहरातील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व असंख्य स्वयंसेवक उपस्थित होते.

दिग्रस नगरपालिकेच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीपर्यंत शहरात विविध उपक्रमाद्वारे स्वच्छता पंधरवाडा आयोजित करण्यात आला होता. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करणे , शहरातील उकिरडे व घाण स्वच्छ करणे , ओला व सुका कचरा एकत्रित करून त्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावणे असे असंख्य उपक्रम नगरपालिकेच्या वतीने या पंधरवाड्यात राबविण्यात आले.

काल दी २ ला शेवटच्या दिवशी सकाळी ७ वाजता ग्रामदैवत श्री घंटीबाबा यांच्या मंदिरापासून भव्य ग्राम स्वच्छता फेरी काढण्यात आली होती. शहरातील मुख्य मार्ग व चौका-चौकात राजकीय पुढारी , सामाजिक कार्यकर्ते , अधिकारी , कर्मचारी व स्वयंसेवकांनी हातात झाडू धरून व केरकचरा दूर सारून स्वच्छता अभियानात आपले योगदान दिले .
मुख्याधिकारी सुधाकर राठोड, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष रविंद्र अरगडे , शहराध्यक्ष संदीप झाडे, प्रमोद बनगीनवार , सुभाष कटेकर , ऍड विवेक बनगीनवार ,स्वप्नील दुधे, किरण खंडारे, राजेंद्र वाघमारे, नगर परिषद बांधकाम शहर अभियंता सोमनाथ सदगर,कार्यालय निरीक्षक योगेश दुधे, योगेश पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी अजय राऊत, क्षेत्र सहाय्यक पी.के.जाधव,संतोष जाधव, वाघमारे, जे.डी. जाधव,वनरक्षक ढाकरे, श्रीमती ठोबे, पूनम जाधव, श्रीमती साबळे, पंकज बानपुरे, धाडसे, पडोळे, अमीर पठाण, गुरनुले, कुंदन खोडे, कैलास कलोसे, उत्तम नरळे,सागर शेळके, गोपाल गवळे,आश्विन इंगळे,किशोर साळुंके,अब्दुल नासीर,महादेव मोडले, सुरेश नरळे, दिग्रस तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक मजहर खान, कार्याध्यक्ष किशोर कांबळे सह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी , सामाजिक कार्यकर्ते , विविध विभागातील अधिकारी , साफसफाई कर्मचारी महिला , नगरपालिकेचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Copyright ©