यवतमाळ शैक्षणिक

सुसंस्कार विद्यामंदिर येथे गांधी व शास्त्री जयंती उत्साहात साजरी

सुसंस्कार विद्यामंदिर येथे गांधी व शास्त्री जयंती उत्साहात साजरी

सिंघानिया नगर स्थित सुसंस्कार विद्यामंदिर येथे अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 153 वी व भारताचे पूर्व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची 117 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे सचिव श्री. के. संजय सर व प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषा कोचे मॅम उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व वंदन करून करण्यात आली. या कार्यक्रमात माध्यामिक विभागातील वर्ग नववीच्या विद्यार्थांनी गांधीजी व शास्त्रीजी या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वाबद्दलचा आदर भाषणे, काव्यवाचन या द्वारे प्रगट केला. खुशी ओसवाल हिने काव्य वाचनाद्वारे,श्रुती मेहरे व अन्वेषा चांदेकर यांनी भाषणाद्वारे,क्षितिज डेहनकर याने या महान विभूतींच्या जीवनातील विविध प्रसंगांचे वर्णन करुन तसेच मंदार बोरकर या विद्यार्थ्याने त्यांच्या जीवनातील विविध घडामोडींना आपल्या भाषणाद्वारे उजाळा देऊन या महान विभूतींना त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या मनातील आदर युक्त भावना शब्दांद्वारे प्रकट केल्या.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. के. संजय सर व प्रमुख पाहुण्या व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषा कोचे मॅम यांनी आपल्या मार्गदर्शनात गांधीजी व शास्त्रीजी यांच्या गुणांचा विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात कसा अंगीकार करावा हे त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगाद्वारे पटवून दिले. तसेच सर्व स्पर्धक व सहभागी विद्यार्थ्यांचे त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणीबद्दल कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वर्ग नववीची विद्यार्थिनी दर्शिका मिरासे हिने केले.या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Copyright ©