यवतमाळ सामाजिक

स्वतंत्र विदर्भ राज्य घोषीत करा गांधी जयंती निमीत्त प्राऊटिस्ट चे आत्मक्लेश आंदोलन

तालुका प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार

स्वतंत्र विदर्भ राज्य घोषीत करा
गांधी जयंती निमीत्त प्राऊटिस्ट चे आत्मक्लेश आंदोलन

घाटंजी :हात्मा गांधी जयंती दिनी विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या आदेशावरून विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यात व तालुका स्तरावर आत्मक्लेश आंदोलन करण्याचे घोषीत करण्यात आले आहे . त्या अनुषंगाने घाटंजी येथे २ आक्टोंबर रोजी गांधी जयंती निमीत्त प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाचे स्वतंत्र विदर्भ राज्य घोषीत करा या मागणी सह केंद्र सरकारने शेतमालावरील जीएसटी मागे घ्यावी , राज्य शासनाने जुलमी विज दर रद्द करावे , राज्य शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकाऱ्यांना प्रती हेक्टर ७५००० रु नुकसान भरपाई जाहीर करावी,
शाकरिता प्राऊटिस्ट मधुकर निस्ताने यांच्या नेतृत्वात घाटंजीत आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले . राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयती निमीत्त विजय बिजेवार , अनिल ढोणे यांचे हस्ते महात्मा गांधी च्या प्रतीमे ला हार अर्पण करून पूजन करण्यात आले . राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय , जय जय विदर्भ, विदर्भ राज्य घोषीत करा , या मागण्यांसह इतर मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या .
या आंदोलनात पी बीआय विदर्भ संघटक – मधुकर निस्ताने सह प्राऊटिस्ट युथ फेडरेशन अध्यक्ष – मोहण पवार, तालुका संघटक – पांडूरंग किरणापुरे, संभू वाढई, पूणाजी आत्राम , मोतीराम मेश्राम , यादव वाघाडे, प्रकाश सिडाम , ज्योतीराम मडावी, गोपाळ पळसकर, चंद्रकला शिरभाते, सुगंधा मडावी, वसंता आत्राम, रावजी आत्राम, अजाब सोयाम, यादव टेकाम, कर्णू उईके, वसंता आत्राम , नागो कनाके , देविदास सिडाम , नारायण तुमराम, शंकर सिडाम , धर्मा वेट्टी , शाम गहे , कीसन तुमडराम . वनदेव मरसकोल्हे, संजय सोयाम, राजू टेकाम, कुणाल तोडसाम याचा सहभाग होता

Copyright ©