यवतमाळ सामाजिक

पांढरकवडा औ. प्र. संस्था बनली समस्याचे माहेरघर

पांढरकवडा औ. प्र. संस्था बनली समस्याचे माहेरघर
——————————————-
प्रशिक्षणार्थ्यांचे भवितव्य धोक्यात?
———————————————————————–
पांढरकवडा:- पांढरकवडा हा तालुका आदिवासी बहुल आहे. त्यामुळे बहुतेकाचा उदरनिर्वाह शेती व मोलमजुरीच्या कामावर चालतो. त्यामुळे स्थानिक परिसरातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपलब्ध होऊन हाताला काम मिळावे व त्यांचे शैक्षणिक भवितव्य उज्वल व्हावे. या उदात्त हेतूने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची निर्मिती पांढरकवडा येथे करण्यात आली. मात्र आजमीतीस सदर औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच समस्याची माहेरघर बनलेली दिसून येत आहे. बाहेरून जरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची अवाढव्य इमारत दिसून पडत असली तरी, इमारतीच्या आत मध्ये अत्यावश्यक असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध होत नसल्या कारणाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य टांगणीला लागले आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षणार्थ्याची जीवित हानी सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी अवस्था दिसून येत आहे. असे असले तरी तालुक्यातील लोकप्रतिनिधीला याचे काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
संस्थेत उपलब्ध असलेल्या व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारची सोई सुविधा उपलब्ध नसल्याने विध्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . जवळपास कॉलेज सुरू होऊन एक महिना झालेला असून विध्यार्थ्यांना शिकवणी सुरू झालेली नाही. विद्यार्थ्यांनी प्राचार्य अशी चर्चा केली असता शिक्षकांची रिक्त पदे असल्याने जेव्हा शासनस्तरावरून रिक्त जागा भरेल तेव्हा तुम्हाला शिक्षक मिळेल असे उडवाउडवीची उत्तर विध्यार्थ्यांना प्राचार्याकडून ऐकण्यासाठी मिळत आहे. विजतंत्री व्यवसायात शिक्षक नसल्याचे विध्यार्थ्यांची ओरड होत आहे.विद्यार्थी काँलेज मध्ये जावून शिक्षक नसल्याने गेल्या पावली परत येत आहे. आय.टि.आय काँलेज मधील बऱ्याच समस्या आहे. पिण्याचे दुषित पाणी, बसण्यासाठी टेबल नाही. सर्वात धोक्याची बाब म्हणजे वीजतंत्री व्यवसाय जिथे प्रात्यक्षिक केले जाते तेथे पाणी गळण्याची मोठी समस्या असल्याकारणाने, कधीही जीवंत वीज प्रवाह पाण्याच्या संपर्कात आल्यास कुठलाही अनुचित प्रकार किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॉलेज मध्ये सुलभ शौचालयाची अवस्था अत्यंत दैननीय असल्याने विध्यार्थ्यांना उघड्यावर जाण्याची वेळ येत आहे. अश्या एक ना अनेक समस्या सोडवण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींनी पांढरकवडा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पाहणी करून आम्हा विध्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी रास्ता अपेक्षा होत आहे. सदर समस्या त्वरित निकाली न निघाल्यास प्रशिक्षणार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Copyright ©