यवतमाळ सामाजिक

वन्यजीव सप्ताह निमित्त पर्यावरण रक्षणाचे धडे

वन्यजीव सप्ताह निमित्त पर्यावरण रक्षणाचे धडे

मनपूर/हिवरी /-वन्यजीव सप्ताह निमित्ताने मनपूर गावामध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हिवरी वनपरिक्षेत्रचे मनपूर राऊंड चे राउंड वनपाल सुनील लोहकरे यांनी पर्यावरणाविषयी अत्यंत महत्वाची माहिती देऊन पर्यावरणाचा समतोल हे मानवी जीवनात खूप आवश्यक आहे हे पटवून दिले.
त्यामध्ये MH29 हेलपिंग हँड टीम उपस्थित राहून त्यांनी गावकऱ्यांना थोडक्यात आपल्या परिसरात सापडणाऱ्या चार विषारी सापाबद्दल माहिती दिली.
यावेळी मनपूर वनरक्षक प्रांजली दांडगे, अर्जुना बिट वनरक्षक विवेक पांडे, वनमजूर विनायक नेवारे ,आणि हेलपिंग हँड टीमचे जीवन तडसें, दीपक मिराशे, सूरज खडके व गावकरी उपस्तीत होते.

Copyright ©