यवतमाळ सामाजिक

कौटुंबिक न्यायालयाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कौटुंबिक न्यायालयाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कौटुंबिक न्यायलय यवतमाळ च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त कौटुंबिक न्यायालय यवतमाळ व जिल्हा वकील संघ यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने मा. प्रमुख न्यायाधीश सुभाष रं. काफरे यांच्या संकल्पनेतून वेलनेस फॉर एवर केमिस्ट अ‍ॅण्ड लाइफ स्टाइल स्टोर्स यांचे मार्फत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम व वकील संघाचे अध्यक्ष अॅड अमित बदनोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षकाराच्या हस्ते फित कापुन करण्यात आले.
या आरोग्य तपासणी शिबिरास माधव बाग च्या डॉ. प्रीति वंजारी, डॉ. पंकज कोटवानी, डॉ. पूजा धकाते दंत चिकित्सक, डॉ लाल पॅथ लॅब चे हर्षवर्धन मानकर यांचे तर शिबिराच्या आयोजनासाठी वेलनेस फॉर एवर केमिस्ट अ‍ॅण्ड लाइफ स्टाइल स्टोर्स यांचे मॅनेजर अमीन अन्सारी, इनचार्ज सुरेश शिंदे, सीनियर एक्झिक्युटिव्ह मार्केटिंग जितेंद्र सोनवणे, फामासिस्ट दामिनि गडदे यांचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी जिल्हा व सत्र न्यायालय यवतमाळ येथील सर्व न्यायाधीश यांची उपस्थिती होती. तसेच यवतमाळ जिल्हा वकील संघाचे जेष्ठ विधिज्ञ अँड. ए. पि. दर्डा तसेच जिल्हा वकील संघाचे सचिव अँड. आशिष तोटे, संदीप गुजरकर, अंकेक्षक अँड. अजय डाखोरे, सदस्य अँड. सुमित कांबळे, अॅड युवराज धांदे, अॅड. मनोज इंगोले, अॅड मयूरी मडावी, विवाह समुपदेशक श्रीमती ज्योती माटे, प्रमोद फाळके, नारायण जाधव, मो. शकील, कार्तिक दळवी, मनीष गंपावार, सचिन पांगारकर, अनिता सोनटक्के, दत्ता जाधव, शुभम फरतोडे व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराच्या माध्यमातून ४०० पेक्षा जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. भविष्यात सुद्धा वेगवेगळ्या प्रसंगी अश्या प्रकारे शिबिराचे आयोजन करण्याचा व त्या माध्यमातून सर्वांचे आरोग्य व स्वास्थ ठीक राहावे या करिता पुढील काही काळात अशा प्रकारे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येईल असा मानस कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश मा. सुभाष रं. काफरे व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड अमित बदनोरे यांनी व्यक्त केला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड मनोज इंगोले तर आभार प्रदर्शन प्रमोद फाळके यांनी केले.

Copyright ©