Breaking News यवतमाळ

*पुरवठा निरीक्षका कडून महिलेचे सोषण, पीडित महिले कडून तक्रार गुन्हा दाखल*

यवतमाळ पुरवठा निरीक्षक याचे विरोधात पीडित महिलेने अत्याचाराची तक्रार दिली

येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या निरीक्षक याचे विरोधात पीडित महिलेने अत्याचाराची तक्रार दिली. इतकेच नव्हे तर त्या निरीक्षकाची पत्नी व आईने पीडित महिलेचे बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करीत अपमानित केल्याचा आरोपही केला आहे. या प्रकरणात अवधूतवाडी पोलिसांनी अत्याचाराच्या गुन्ह्यासह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.राजेश रमेश शिरभाते (रा. मिलिंद सोसायटी, यवतमाळ) असे पुरवठा निरीक्षकाचे नाव आहे. त्याने तहसील कार्यालयात कामानिमित्त आलेल्या महिलेशी आपल्या जाळ्यात अडकून तिला वेगवेगळ्या आमिष देत तिचे सर्व तो परी सोषन केले, हा नराधम सन. २०२० पासून पीडित महिलेचे शोषण करीत होता. राजेशची पत्नी जिल्ह्याबाहेर सरकारी नोकरीत असल्याने राजेश पीडितेला स्वतःच्या घरीच ठेऊन पत्नीचा दर्जा देत तिच्याशी नको ये कृत्य करीत होता. तिला आपण लवकरच लग्न करू असे आश्वासन देऊन राजेशने पीडितेवर वारंवार अत्याचार केला, कोरोनानंतर लग्न करू, असे आश्वासन दिले. मात्र, पीडिता लग्नाबाबत विचारणा करत असता राजेश तिला टाळाटाळ करू लागला. २८ सप्टेंबरला सकाळी ९.१५ वाजता पीडिता राजेशच्या घरी गेली असता राजेश, त्याची आई व पत्नी यांनी जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या मारहाणीत पीडितेच्या हाताला दुखापत झाली, या प्रकरणी पीडिता ने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्या वरुन पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

Copyright ©