यवतमाळ सामाजिक

नवनियुक्त मुख्याधिकारी श्री डोलारकर यांची संकल्प फाउंडेशन ने घेतली सदिच्छा भेट

नवनियुक्त मुख्याधिकारी श्री डोलारकर यांची संकल्प फाउंडेशन ने घेतली सदिच्छा भेट

नगरपरिषद कार्यालय यवतमाळ येथे जाऊन संकल्प फाउंडेशन व संकल्प वनिता वाहिनीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी नव्यानेच रुजू झालेले नवनियुक्त मुख्याधिकारी श्री दादाराव डोलारकर यांची सदिच्छा भेट घेतली सामाजिक कार्याबद्दल अनेक विषयावर या वेळी चर्चा करण्यात आली नगर प्रशासनाची सोबत राहावी ह्या उद्देशाने आजची ही सदिच्छा भेट संकल्प फाउंडेशन च्या माध्यमातून घेण्यात आली यावेळी संकल्प फाउंडेशन राबवित असलेल्या अनेक सामाजिक उपक्रमाची माहिती नवनियुक्त मुख्याधिकारी श्री डोलारकर यांना संकल्प फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्ष श्री प्रलय टीप्रमवार यांनी दिली यावेळी सभागृहामध्ये संकल्प फाउंडेशन चे सरचिटणीस श्री वसंत शेळके भोजन सेवा समिती अध्यक्ष श्री प्रकाश दिघडे सहसंघटक नितीन माटे शहराचे प्रतिनिधी प्रमुख सागर तुमसरे रवी कडू राजेंद्र गावंडे जिल्हा कार्यकारणी सदस्य रवी ठाकूर अरुण चंद्रे महादेव काचोरे विकी खंदरकर तर संकल्प वनिता वाहिनीच्या महिला प्रमुख सौ अंजली फेंडर सौ ज्योती डबावार नयना एबरवार सौ किरण दिघडे सौ संगीता टीप्रमवार सौ वर्षा गावंडे सौ स्नेहल रेचे उपस्थित होते

Copyright ©