यवतमाळ सामाजिक

चिखलवर्धा ग्रामपंचायत मध्ये समाधान शिबिर संपन्न

घाटंजी तालुका प्रतिनिधी अमोल नडपेलवार

चिखलवर्धा ग्रामपंचायत मध्ये समाधान शिबिर संपन्न

शिबिरामध्ये जातीचे प्रमाणपत्र उत्पन्नाचे दाखले व आधिवास प्रमापत्रा चे वाटप करण्यात आले

घाटंजी. चिखलवर्धा ग्रामपंचायत कार्यालय मध्ये समाधान शिबिराचे आयोजन आज रोजी बुधवार ला करण्यात आले या निमित्त समस्त गावकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते व समाधान शिबिर राबवण्यात आले शिबिरामध्ये घाटंजी तालुक्याचे निवासी नायब तहसीलदार गेडाम मॅडम यांच्या हस्ते जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, वय आणी अधिवास ई. प्रमाणपत्र वाटप करण्यात आले व अनेक समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले, तलाठी राजकुमार गरुडे, ग्रामपंचायतचे सचिव पि.एम. भगत, पदाधिकारी उपसरपंच आकाश नडपेलवार, ग्रा.पं. सदस्य जैतू मेश्राम, आशा स्वयंसेविका निताताई कनाके, जयश्री कनाके गावातील प्रतिष्ठित नागरिक, पेसा समिती अध्यक्ष बंडूभाऊ कुंभेकर, दशरथ वसंता कंठेश्वर, अशपाक शेख, ज़ि.प.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास नेवारे, झाटाला सोसायटी सदस्य भीमराव पेंदोर, दिगंबर जुमनाके, अब्रार शेख, शमी उल्ला खान, ज्योतीराम चव्हाण, जावेद भाई इकबाल, अब्दुल वाजिद, अब्दुल गणी, व ग्रामपंचायत कर्मचारी ऑपरेटर फिरोज खान, नागोराव नेवारे, बिरबल आडे रोजगार सेवक रमेश कुमरे, आभार प्रदर्शन आकाश नडपेलवार यांनी केले

Copyright ©