यवतमाळ राजकीय

*मा.आ.मदनभाऊ येरावार यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न*

भारतीय जनता पार्टी,यवतमाळ विधानसभा

मा.आ.मदनभाऊ येरावार यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न…

27 सप्टेंबर 2022 रोजी महिला व नवजात शिशु रुग्णालय यवतमाळ येथे भारतीय जनता पार्टी यवतमाळ विधानसभेच्या आयोजनात मा आ मदनभाऊ येरावार व भाजपा जिल्हाध्यक्ष श्री नितीनजी भुतडा यांच्या मार्गर्शनाखाली भव्य महाआरोग्य शिबीर संपन्न झाले .भाजपा जिल्हा सचिव सूरज गुप्ता यांच्या संयोजनामधे महाआरोग्य शिबिर राबविण्यात आले.डॉ दीपक शिरभाते, डॉ पूजा मून ,डॉ सुरेंद्र इरपनवार,दर्शन चांडक,पंकज नानवानी यांनी शिबिराचे नियोजन केले.तसेच राजूभाऊ पडगीलवार जिल्हा महामंत्री,बाळासाहेब शिंदे विधानसभा प्रमुख ,प्रशांत यादव पाटील शहर अध्यक्ष,जितेंद्र विरदंडे तालुका अध्यक्ष,शंतनुभाऊ शेटे शहर महामंत्री,हेमंतजी दायमा शहर महामंत्री,अमोलभाऊ देशमुख शहर महामंत्री,अजयभाऊ खोंड शहर महामंत्री यांनी आयोजन समिती मध्ये जबाबदारी पार पाडली.
या महाआरोग्य शिबिरामध्ये हृदयरोग,पोटांचे व आतड्यांचे आजार,सर्व प्रकारचे कॅन्सर,जनरल सर्जरी,किडनी रोग,फुफ्फुसाचे,विकार,छातीचे विकार, अर्धांग वायू, मधुमेह, मुळव्याध ,भगंदर ,बहिरेपणा, रक्तदाब,दातांचे आजार,बालरोग,स्त्रीरोग,त्वचारोग,कान – नाक – घसा रोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ इत्यादी सर्वच प्रकारच्या आजारांचे नागपूर व यवतमाळ येथील सुप्रसिध्द तज्ञ डॉक्टर्स यांनी या महाआरोग्य शिबीर मध्ये मोफत सेवा दिली.त्याचप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, महिला रुग्णालय येथील डॉक्टर्स व नर्सेस महात्मा फुले जन आरोग्य टीम ,केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन या सर्वांनी शिबिराला यशस्वी करण्यासाठी अतिशय मोलाचे योगदान दिले.
शिबिराच्या शेवटपर्यंत १३५७ रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी करून मोफत औषधी वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे 32 रुग्णांची मोफत एन्डोस्कोपी करण्यात आली. 84 रुग्णांची मोफत इसीजी करण्यात आले. २८९ रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. ३२रुग्णांना आयुष्मान भारत योजनेचे कार्ड बनवून देण्यात आले. त्याचप्रमाणे 82 नागरिकांना मोफत बूस्टर डोज देण्यात आले .२७६ रुग्णांचे मोफत एक्स-रे काढण्यात आले. ३०० च्या वर रुग्णांची नेत्र तपासणी करून काही रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येईल. त्याचप्रमाणे मोफत बहिरेपणाची तपासणी करून शासकीय योजनेच्या माध्यमातून जवळपास 33 रुग्णांना मोफत श्रवण यंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. अशाप्रकारे समाजसेवेचा , अंत्योदयाचा ध्यास उराशी बाळगत भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाआरोग्य शिबिर संपन्न झाले.

शिबिर संपन्न करण्यासाठी डॉ.तगडल्लेवार सर, डॉ. पाटील सर,डॉ. रमा बाजोरिया मॅडम,डॉ.भानुप्रिया देवतळे मॅडम, औषधी विभागाचे चोरमले सर,श्री नितीनभाऊ गिरी,सौ रेखाताई कोठेकर,सौ. नंदाताई जीरापुरे, अजिंक्य शिंदे, अभिषेक श्रीवास, सुरज जैन,स्वप्निल उलंगवार,जय चौधरी,चिन्मय बाळापुरे, जीवन निमनकर,अजय चमेडिया, नयन गुप्ता,राज पिंपळशेंडे, आशु वागदे, अभिषेक जाधव, चिकू मुराई, निलेश खोब्रागडे, अभि मांडले, शिवम डोईजड, अमोल हांडे, उमेश राठोड, क्षितिज मडकराम,यश वायकुळे* यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी श्याम भाऊ जयस्वाल, विजय खडसे ,सुनील समदूरकर ,सौ मायाताई शेरे,सौ कीर्ती ताई राऊत, उषाताई खटे ,भारतीताई जाठे, करुणा ताई तेलंग, प्रियंका ताई भवरे, रीताताई धावतोडे, सुषमाताई राऊत ,लताताई ठोंबरे, प्रशांत देशमुख,किशोर जोतवानी, मनोज मुधोळकर आकाश धुरट , रोहित राठोड ,शुभम सरकाळे, योगेश पाटील ,शुभम चोरमले, यश चव्हाण, भावीन पतिरा , नितीन जंगठे, बाळा कायपेलवार, कृष्णा डफळे आदि पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते…

Copyright ©