यवतमाळ सामाजिक

*यवतमाळ जिल्हा ग्रंथपाल मित्र परिवार’ तर्फे डॉ. कृष्णकुमार मांडगावकर यांचा कार्यगौरव*

 

यवतमाळ: प्रतिनिधी

संशोधक, मार्गदर्शक, अध्यक्ष ग्रंथालय व माहितीशास्त्र अभ्यास मंडळ संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठ ग्रंथपाल संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणी पदाधिकारी, तथा आबासाहेब पारवेकर महाविद्यालय यवतमाळचे माजी ग्रंथपाल डॉ. कृष्णकुमार मांडगावकर यांचा शनिवार, दि. 24 सप्टेंबर रोजी “यवतमाळ जिल्हा ग्रंथपाल मित्र परिवार” तर्फे “कार्यगौरव व सत्कार सोहळा” संपन्न झाला. त्यांचे मार्गदर्शनात आजपर्यंत 18 विद्यार्थ्यांना “ग्रंथालय व माहितीशास्त्र” ह्या विषयात “आचार्य” पदवी प्राप्त झाली आहे. त्यांनी सेवाकाळात ग्रंथालय सेवा आधुनिकीकरणासाठी भरीव योगदान दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गणपत उरकुंदे यांचे शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर सौ. राधिका मांडगावकर यवतमाळ, ग्रंथपाल डॉ. छायाताई जतकर पुसद ह्या प्रमुख पाहुण्या म्हणुन उपस्थित होत्या. प्रास्ताविक सुरेश फुलकर ग्रंथपाल राळेगाव यांनी केले. प्रसंगी कोरोना काळात सेवानिवृत्त झालेले डॉ. गणपत उरकुंदे माजी ग्रंथपाल इंदिरा महाविद्यालय कळंब यांचा ग्रंथपाल डॉ. संजय शेणमारे बाभुळगाव, ग्रंथपाल विवेक जगताप घाटंजी आणि ग्रंथपाल डॉ. मिलिंद लाभसेटवार यवतमाळ ह्यांचे शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. प्रसंगी डॉ. राजाभाऊ बाजड यवतमाळ, यशवंत धोटे आर्णी, सुरेश इंगळे नेर, सुधिर नारखेडे यवतमाळ, शामकांत डगवार यवतमाळ, प्रशांत शिरसाट कारंजा, श्यामकुमार गोरडे यवतमाळ, पवन वानखेडे यवतमाळ, संदीप सत्तुरवार यवतमाळ, योगेश दौलतकर दिग्रस, मनोज भसाखेत्रे यवतमाळ, डॉ. श्याम बोधकुरवार मुकुटबन, डॉ. यशवंत देशमुख यवतमाळ, डॉ. विरेंद्रकुमार बरडे राळेगाव, डॉ. संदिप देसाई पारवा व इतरांनी सत्कारमूर्तीप्रति आपल्या सदभावना व्यक्त केल्या. विवेक जगताप व डॉ. मांडगावकर यांनी प्रसंगी गीत गायनातून आपल्या भावना प्रगटकेल्यात. प्रसंगी चि. वरद मांडगावकर सुध्दा आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुमधुर सूत्रबद्ध संचालन ग्रंथपाल डॉ. राजश्री धर्माधिकारी यवतमाळ यांनी तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल डॉ. एकता मेनकुदळे केळापुर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथपाल सौ. मनीषा जगताप यवतमाळ यांचेसह सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Copyright ©