Breaking News यवतमाळ

*घाटंजी येथे रेतीच्या टॅक्टर प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल*

 

तालुका प्रतिनिधी
अमोल नडपेलवार/घाटंजी

घाटंजी:- काल दिनांक २५/९/२०२२ ला मानोली ते सोनुमंगलम या मार्गावर दोन टॅक्ट्रर ने अवैध रेती जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळताच दस्तुरखुद तहसीलदार पूजा माटोडे यांनी दोन टकट्टर चालकास पकडले. मात्र रस्त्यावर रेती टाकून सदर दोन्ही टॅक्ट्रर पसार झाले.
सदर प्रकरणी फ्रियादी तहसीलदार पूजा माटोडे यांच्या फिर्यादी वरून विक्रम उर्फ अक्षय मस्के वय २४, शाम खांडारे वय ४७, आणि शुभम खांडारे वय २५ यांच्यावर भादवी ३५३,३९२,५०६,
३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणातील तीनही आरोपी फरार आहे. सदर घटना काल घडल्यानंतर आज सकाळी पासून पोलिसांनी प्रसार माध्यमांना माहिती देण्यास टाळाटाळ केली. प्रशासनावर स्थानिक आर्णी मतदार संघातील एका मोठ्या नेत्याचा आणि लोकप्रतिनिधींचा दबाव असल्याची चर्चा शहरात आहे.
महसूल कर्मचारी यांच्यावर अश्या प्रकारे हल्ले होण्याची ही दुसरी वेळ आहे. आता तरी याप्रकरणी दोषींनवर योग्य ती कारवाई होणार काय हे पाहण्यासारखे असेल.
सदर प्रकरणी पुढील तपास ठाणेदार मनीष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली psi शिशिकांत नागरगोजे करीत आहे.

————————————–

प्रतिक्रिया:-
वरिष्ठ अधिकारी नेहमी रेती संदर्भात माहिती घेतात. त्यामुळे तलाठी मंडळ अधिकारी यांना यासंदर्भात वारंवार सूचना देत असतो. त्यानुसार तेही काम करताना पण रेती तस्कराडून जीव मारण्याचा धमक्या येत असल्याचे तसेच वारंवार असेल प्रकार सुरू असल्याने एक महीला अधिकारी म्हणून मला आणि इतर महसूल कर्मचारी यांना काम करताना मोठा प्रश्न निर्माण झाल आहे.
– पूजा माटोडे

Copyright ©