यवतमाळ सामाजिक

अतिक्रमणधारक फासे पारधी 1970 पासून पट्ट्यापासून वंचित

अतिक्रमणधारक फासे पारधी 1970 पासून पट्ट्यापासून वंचित

गुरुदेव युवा संघ त्यांच्या न्यायासाठी लढणार लढाई
यवतमाळ : मौजा दहेगाव ता.राळेगाव जि. यवतमाळ येथील पारधी समाजातील 65 परिवार 1970 पासून वन विभागाच्या जमीनीवर मौजा दहेगाव, मंगी शिवार येथे शेती करीत असून त्यांना आजपावेतो त्यांना शासनाच्या वतीने कुठल्याच कागद देण्यात आला नाही. त्यांच्या न्याय हक्कासाठी गुरुदेव युवा संघ तिव्र आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी सांगीतले.
राळेगाव तालुक्यातील माैजा दहेगाव, मंगी शिवार येथील 65 फासे पारधी समाज 1970 पासून वन विभागाच्या 217 एकर शेत जमीनीवर 65 कुटूंब शेती करीत अाहे. यापैकी 18 लाभा्र्थ्यां ना पट्टे देण्यात आले. उर्वरीत 47 लाभार्थी आजपर्यंत वंचित आहे. हा समाज चाेरी, भिक मांगुन खाने, लुटमारी यासारखे धंदे करुन आपला गुजरान करीत होता. परंतु या समाजातील काही जणांनी वनविभागाच्या जमीनीवर अतिक्रमण करुन 1970 पासून शेती करुन आपल्या उदरनिर्वाह चालु केला. या 52 वर्षात त्यांना शासकीय स्तरावरुन कोणतीच मदत मिळाली नाही. त्यांना हक्काचे पट्टे मिळावे याकरीता त्यांनी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोजभाउ गेडाम यांच्या संपर्क साधून त्यांना सदर गावात बोलावून सर्व हकीगत सांगीतली व आम्हाला न्याय मिळून देण्याची गुरुदेव युवा संघाकडे मागणी केली. त्या मागणीच्या अनुषंगाने त्या बुधवार दि.21 सप्टेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या माेर्चोत जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देवून या पारधी समाजातील 47 फासे पारधींना पट्टे देण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांना पिक कर्ज, कृषी विभागाच्या असलेल्या योजनांमध्ये सामावून घेण्याचीसुध्दा मागणी करण्यात येणार अाहे. तसेच सध्या पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय कार्यालयात सेवा पंधरवाडा हा सप्ताह सुरु असून या पंधरवाडा सप्ताहातच या पारधी समाजातील 47 जणांना त्यांचे हक्काचे शेत जमीनेचे पट्टे वाटप करण्यात यावे अशी मागणी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम, किशोर नरांजे, चरकी चंपत भोसले,नाभिक मंजुळा पवार, अरविंदा पवार, मंजुळा पवार, यशवंत पवार, वनिश घोसले यांच्यासह 47 फासे पारधी समाजातील नागरीकांनी सांगीतले आहे.

Copyright ©