यवतमाळ सामाजिक

दामिनी गायकवाड ने पटकावले प्रथम पारितोषिक “सोन्याची नथ”

दामिनी गायकवाड ने पटकावले प्रथम पारितोषिक “सोन्याची नथ

( डॉ. निरज वाघमारे आयोजित दांडीया गरबा स्पर्धेत शेकडो महिलांची उपस्थिती.)

गेल्या महिन्याभरा पासून नवरात्र महोत्सवाची लगबग शहरासह जिल्ह्याभरात चालू आहे. याचं दरम्यान महीलांच आवडता असलेला दांडीया गरबा खेळाचे विविध ठिकाणी आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणुन शहारातील युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ. निरज वाघमारे यांनी शहरांतील पीपल्स कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या १९ सप्टेंबर पासुन मोफत गरबा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. काल या प्रशिक्षणाची सांगता करून बक्षिस वितरण करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकीत्सक राठोड तर प्रमुख अतिथी म्हणून सोनार समाजाचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, वणी पोलिस स्टेशनच्या स.पो. नि. माया चाटसे, कुंदन नगराळे उपस्थित होते.
यवतमाळ मधील नवरात्र उत्सवाची प्रसिद्धी देशभरात असुन देशात दुसऱ्या क्रमांकावर या उत्सवाची गणना केली जाते. या दरम्यान शहरात विविध सामजिक उपक्रम व स्पर्धेच्या आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून डॉ. निरज वाघमारे यांनी दिनांक १९ सप्टेंबर पासुन शहरांतील महिलांसाठी मोफत गरबा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. तर या प्रशिक्षणाच्या अखेरीस काल (दिनांक २४ रोजी सायंकाळी ०७.०० वाजता.)धमाल दांडिया गरबा नाईट व यात विजेत्यांना मौल्यवान पारितोषिके देऊन त्यांच्या गुणगौरव करण्यात आले. या धमाल दांडिया गरबा स्पर्धेत प्रथम विजेत्यांला सोन्याची नथ देण्यात आली. नेताजी नगरातील कु.दामिनी गायकवाड ह्या मुलीने उत्कृष्ठ गरबा नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली या नृत्य सादरीकरणा बाबत प्रेक्षकांकडून तिचा प्रथम क्रमांक घोषित करण्यात आला. या बाबत तीला उपस्थितांच्या हस्ते प्रथम पारितोषिक सोन्याची नथ, पदक व पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन करण्यात आले. तर व्दितीय क्रमांकास पैठणी साडी हे पारितोषिक ठेवण्यात आली या पारितोषिकासाठी सौ.गायत्री सनेसर यांचे नामांकन देण्यात आले. तर तृतीय क्रमांक प्राप्त सौ.धम्मशिला कांबळे यांना मोत्याचा हार तर रुक्मिणी लोणारे या स्पर्धक महिलेला प्रोहत्सानपर बक्षिस देण्यात आले. तर दुसऱ्या ३ ते १४ वयोगटातील स्पर्धकांसाठी प्रथम पारितोषिक ११११/- रुपये, व्दितीय ७७७/- तर तृतीय ५५५/- रुपयांची रोख पारितोषिक देण्यात आली. यात स्पर्धक कु. आर्शिया धरणकर, कु. अलंक्रीता वाघमारे व कु. अक्षरा जवादे यांना परीक्षकांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक जाहीर केला.
दिनांक १९ सप्टेंबर पासुन डॉ. निरज वाघमारे यांनी आयोजित केलेल्या मोफत दांडीया गरबा प्रशिक्षणात ५०० ते ६०० महिलांनी सहभाग नोंदविला होता. तर अखेरीस आयोजित केलेल्या धमाल दांडिया गरबा नाईट स्पर्धेमध्ये असंख्य महिलांनी सहभाग नोंदवून या खेळाचा आनंद लुटला. विद्युत रोषणाई व प्रचंड प्रेक्षकांच्या उपस्थित हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. तर डॉ. निरज वाघमारे यांनी आम्हा महिलांसाठी मोफत स्वरूपात अतिशय उत्कृष्टपणे प्रशिक्षणाचे व स्पर्धेचे आयोजन केल्या बद्दल स्पर्धक महिलांनी आयोजकांचे आभार मानले. या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी सौ. विजया भगत, सौ. पुनम हर्षे, सौ. रचना सोनुने, सौ.प्रियंका गोडे, प्रेम निरगुडकर व अमित राऊत यांची तर सूत्रसंचलक म्हणुन साहिल दरणे यांची उपस्थिती होती.

*** चौकट *******
*आयोजकाच्या मुलीचा मनाचा मोठेपणा..*
दुसऱ्या गटात ३ ते १४ वर्षापर्यंत स्पर्धकांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अंतिम फेरीसाठी आयोजकांची कन्या कु. अलंक्रीता निरज वाघमारे (वय वर्ष १० ) हीची निवड झाली होती. यातून तिला स्पर्धकांनी द्वितीय क्रमांक दिला. परंतु सदर कार्यक्रमा हा माझ्या वडिलांनी आयोजित केला असल्याने इतर स्पर्धकाना गैरसमज व्हावा नाही. व माझ्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या लहान मुलीला हे बक्षीस देऊन तीला प्रोहत्सान द्यावे म्हणून मी हा क्रमांक नाकारतोय असे म्हणून कु. अलंक्रीता हीने हे बक्षीस घेण्यास नकार दर्शविला. परंतु कु. अलंक्रीता हिने सादर केलेल्या उत्कृष्ट नृत्याने प्रेक्षकांनी तिला बक्षीस घेण्यास विनंती केली. एवढ्या लहान वयात एवढा मोठा समजूतदारपणा व मनाचा मोठेपणा दाखविल्याबद्दल सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कु. अलंक्रीताचे कौतुक केले.

Copyright ©