यवतमाळ सामाजिक

मनोकामना पूर्ण करणारी आसे गाव देवीची आई जगदंबा

मनोकामना पूर्ण करणारी आसे गाव देवीची आई जगदंबा

उद्यापासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ
विविध कार्यक्रमाचे आयोजन

29 तारखेला यवतमाळ येथील प्रसिद्ध गायक जितू पाखरे यांचा भव्य जगराता

यवतमाळ:-आसेगाव देवी येथील हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. नवरात्र मध्ये आई जगदंबेच्या दर्शनासाठी अलोट गर्दी होत असते.
त्यांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या आई जगदंबा विषयी आख्यायिका सांगितली जाते. संस्थानंच्या वतीने या विषयी माहिती देताना सांगितले की ई.स.1670 मध्ये आसेगाव देवी मराजी नावाचे एक व्यक्ती होऊन गेले.
ते दिवसभर गावामध्ये गाई राखून त्यानंतर गोठणाची साफसफाई ते करत होते.जणू त्यांनी गावाला स्वच्छतेचा मंत्र दिला होता. गाईचे धन गावांमध्ये जास्तीत जास्त वाढावे गाव समृद्ध व्हावे यासाठी ते रात्रंदिवस झटत असे. त्यांची गो मातेची सेवा पाहून एके दिवशी आई जगदंबा मातेने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले.
आसेगाव देवी येथील भगवान मुंगसाजी महाराजांचे परम शिष्य संत घोगले बाबांनी त्यांच्या काव्यसंग्रहामध्ये संत मराजी महाराजा विषयी लिहिलेले आहे.
एके दिवशी मराजी गाई घराकडे वळवत होते त्याचवेळी प्रत्यक्ष आई जगदंबा त्यांच्यासमोर उभी राहिली तु मला सोबत घरी घेऊन चल तिथेच तुझ्याकडून कल्याणकारी कार्य घडावे म्हणून स्थिरावेल.
परंतु तू समोर चालत असताना मागे वळून पाहू नकोस. चालत चालत गाव जवळ आले.मराजीनी मागे वळून पाहिले तो काय प्रकार आई जगदंबा गुप्त झाली.
त्याच ठिकाणी मराजीनी आई जगदंबेची स्थापना केली.
त्याकाळी मातीचा परकोट बांधून मंदिराची निर्मिती करण्यात आली. आई जगदंबा मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्र,गुजरात,आंध्र प्रदेश इतर राज्यातून हजारो फक्त दर्शनासाठी येत असतात.
यावर्षी संस्थांतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुषोत्तम महाराज यांच्या प्रवचना प्रवचनाचा कार्यक्रम दिनांक 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर तारखेपर्यंत आयोजित केलेला आहे.
29 सप्टेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध गायक जितू महाराजांचा भव्य जगराता आयोजित केलेला आहे. सोबतच
संस्थांनच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केलेले आहे.3 ऑक्टोंबर ला सायंकाळी 50वाजता गावामधून भव्य दिंडी निघणार आहे.
आणि 4 तारखेला महाप्रसाद असणार आहे. क वर्ग तीर्थक्षेत्रांमधून संस्थांना निधी मंजूर झाला असून येथील भक्त निवासाचे काम चालू आहे

Copyright ©