यवतमाळ शैक्षणिक

भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालयात दिक्षारंभ समारंभ संपन्न

भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालयात दिक्षारंभ समारंभ संपन्न

स्थानिक भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालयात पदवी, पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करने व त्यांना महाविद्यालयातील विविध घटक, सोई-सुविधा इत्यादींचा परिचय करून देण्याच्या अनुषंगाने दिक्षारंभ समारंभाचे आयोजन महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाद्वारे दि. १२ ते १७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत करण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशाप्रमाणे विविध सत्रांमध्ये सलग सहा दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि. १२ सप्टेंबर २०२२ ला या कार्यक्रमाचा उदघाट्न सोहळा महाविद्यालयाच्या प्राचार्य, डॉ. प्रतिभा काळमेघ यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा. राजकुमार वाघ यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी मंचावर संयोजक डॉ. दीपक कोटुरवर प्रामुख्याने उपस्थित होते. त्याच दिवशी दुसऱ्या सत्रामध्ये महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा परिचय करून देण्यात आला. दि. १३ सप्टेंबर २०२२ च्या पहिल्या सत्रात नवप्रवेशित विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. चंद्रकांत सरदार यांनी ‘महाविद्यालयाची नीती-मूल्ये’ या विषयावर तर प्रा. डॉ. चंद्रशेखर ठाकरे यांनी महाविद्यालयातील सोई-सुविधा या विषयावर, प्रा. डॉ. किशोर शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन केले. दि. १४ सप्टेंबर २०२२ ला विद्यार्थ्यांची लिखाणातील अभिरुची वाढविन्याच्या हेतूने प्रा. डॉ. युवराज मानकर यांनी विद्यार्थ्यांना ‘सर्जनशील लेखन’ या विषयावर, प्रा. डॉ. कल्पना कोरडे यांचे अध्यक्षतेखाली मार्गदर्शन केले. तर याच दिवशी दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी ग्रंथपाल, डॉ. संजय शेणमारे यांचे मार्गदर्शनात महाविद्यालयाचा आत्मा म्हणजेच ग्रंथालयाला भेट दिली. दि. १५ सप्टेंबर २०२२ च्या पहिल्या सत्रात प्रा. डॉ. सुधीर त्रिकांडे यांनी विद्यार्थाचे ध्येय निश्चिती या विषयावर, प्रा. डॉ. दिलीप खूपसे यांचे अध्यक्षतेखाली उदबोधन केले. तर दुसऱ्या सत्रात, विविध विषयांवर आयोजित गटचर्चेमधे विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. दि. १६ सप्टेंबर २०२२ ला प्रा. डॉ. निलेश सुलभेवार यांनी पहिल्या सत्रात ग्रंथपाल, डॉ. संजय शेणमारे यांचे अध्यक्षतेखाली ‘ऑनलाईन शिक्षणाच्या संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे नवनियुक्त सचिव, प्रा. डॉ. प्रवीण रघुवंशी तथा नुटा संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते प्रा. गुल्हाने यांनी महाविद्यालयात आयोजित दिक्षारंभ समारंभास सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याच दिवशी दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. दिलीप खूपसे व प्रा. डॉ. कल्पना कोरडे यांचे मार्गदर्शनात आयोजित ‘एक मिनिट शो’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. दि. १७ सप्टेंबर २०२२ ला पहिल्या सत्रात महाविद्यालयातील डॉ. विकास टोणे संचालक शारीरिक शिक्षण यांनी, प्रा. डॉ. वामन विरखडे यांचे अध्यक्षतेखाली ‘योगा व ध्यान या माध्यमातून तणाव मुक्ती’ या विषयावर विद्यार्थ्यांचे उदबोधन केले. या दिक्षारंभ समारंभाचे शेवटचे सत्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रतिभा काळमेघ यांच्या अध्यक्षतेखाली व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नितीन रिठे, तंत्रज्ञान समन्वयक, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय पुसद यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी मंचावर संयोजक प्रा. डॉ. दीपक कोटुरवर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रसंगी कु. सुषमा भोयर व चंद्रशेखर बावणे यांनी महाविद्यालयात आयोजित दिक्षारंभ समारंभाविषयी आपले मनोगत व्यक्त केले तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नितीन रिठे यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयात बी. ए., बी. कॉम., व बी. एस्सी. भाग १, चे नवप्रवेशित विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रा. डॉ. गजानन माने व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Copyright ©