यवतमाळ सामाजिक

MH29 हेलपिंग हँड टीम द रिअल हिरो पुरस्काराने सन्मानित

MH29 हेलपिंग हँड टीम द रिअल हिरो पुरस्काराने सन्मानित

सर्पतज्ञ डॉ.निलीमकुमार खैरे व संजय नाकाडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली येथे भरलेल्या द रिअल हिरो अवॉर्ड 2022 यामध्ये
वन्यजीव क्षेत्रामध्ये काम करत असणारे महाराष्ट्रातील उत्कृष्ट काम करणारे वन्यजीव रक्षकांना त्याच्या कामगिरी बद्दल गौरविण्यात आले.

यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत
असणारी MH29 हेलपिंग हँड वाईल्ड एडव्हेंचर अँड नेचर क्लब टीम च्या वन्यजीव रक्षकांना डॉ.निलीमकुमार खैरे यांच्या हस्ते ‘द रियल हिरो, पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यामध्ये टीम चे संस्थापक अध्यक्ष निलेश सुधाकर मेश्राम,शहर अध्यक्ष प्रज्वल तुरकाने,रलेगाव तालुका अध्यक्ष संदीप लोहकरे,युवा प्रमुख मोंटू टेलगोटे, आर्णी तालुका अध्यक्ष अनिकेत पंडित, देवळी येथील रोहित भादिकर, किनवट तालुका अध्यक्ष मोहन मुरखे, पुसद तालुका अध्यक्ष दिनेश पिंपरे, नेर तालुका अध्यक्ष अक्षय धोमणे, व संस्थेचे युवा प्रसिद्धी प्रमुख जीवन तडसें , दीपक मिरासे, श्रीपाल राठोड, पंकज हेमने, अभि बोरकर, यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे हिंगोली मतदार संघातील आमदार मा.श्री. संतोषभाऊ बांगर व महाराष्ट्रातील सर्पअभ्यासक यांच्या उपस्थितीत गौरव सोहळा पार पडला.

Copyright ©