यवतमाळ सामाजिक

बस गावात न येता चक्क हायवे न जातात प्रवाशी व विद्यार्थ्याचे नुकसान

बस गावात न येता चक्क हायवे न जातात प्रवाशी व विद्यार्थ्याचे नुकसान

यवतमाळ आर्णी या राष्ट्रिय राज्य महामार्गावरील एसटी महामंडळाच्या बसेस गावात न येता चक्क हायवे नी जात असल्याने विद्यार्थ्याना शाळा कॉलेज पासून वंचित राहावे लागत आहे,प्रवाशी तर खाजगी वाहनाने ये जा करू शकतात परंतु विद्यार्थांचे काय ? असा प्रस्न एसटी वया स्थापकाना करण्यात येत आहे ,यवतमाळ आगाराची एकही बस वेळेवर येत तर नाहीच आणि आली की मधाताच कुठे तरी थांबून जाते,स्कूल बस सुद्धा वेळेवर येत नसल्याने विद्यार्थिनीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे यवतमाळ आगारा वर अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे
गेल्या अनेक दिवसा पासुन शाळेत जाण्यासाठी बसस्थानकावर आलेल्या विद्यार्थ्यांना न घेता एसटी बस बायपास मार्गाने निघून जाते. या प्रकारामुळे शाळेला उशीर होऊन विद्यार्थांचे नुकसान होत असून याला जवाबदार कोण? विद्यार्थांचा अभ्यास बुडतो, या प्रकरणी हिवरी येथील विद्यार्थ्यांनी महामंडळाच्या यवतमाळ आगार प्रमुख यांचे कडे तक्रार केली आहे.

आर्णी मार्गावर असलेल्या हिवरी येथून अनेक विद्यार्थी यवतमाळ व इतर ठिकाणी शाळा – महाविद्यालयात जातात. सकाळी भरणाऱ्या वर्गासाठी ते बसच्या वेळेवर स्थानकावर पोहचतात. परंतु अनेक बसेस बायपास ने निघून जात असल्यामुळे.शिवाय, शाळा सुटल्यानंतर बस उपलब्ध नाही. या प्रकारात अडचणींचा सामना करावा लागतअसल्याने, या संदर्भात विद्यार्थ्यांनी आगार प्रमुख यांचे कडे निवेदन देऊन प्रत्येक बस गावा मधून म्हणजेच बसस्थानका वरूनच पाठविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली, याची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©