Breaking News यवतमाळ

अज्ञात व्यक्तीं काळी पिवळी पेटवली

अज्ञात व्यक्तीं काळी पिवळी पेटवली

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत भांबं राजा येथील सचिन सोणवाने याची काळी पिवळी रात्रीच्या वेळी घराजवळ नेहमी प्रमाणे उभी ठेवली मात्र माथे फिरु अज्ञात व्यक्तींने संधी साधून एम एच २९ टी ८४२४ क्रमांकाची काळी पिवळी पेटवली ती पुर्णतः जळून खाक झाली सचिन हा सुशिक्षित बेरोजगार असल्याने शासकीय नौकरी मिळत नसल्याने वाहन घेऊन आपला व परिवाराचा कसा बसा उदर निर्वाह सुरू होता मात्र काही माथेफिरूने अंधाराचा फायदा घेत काळी पिवळी ला आग लावली त्यात हि पुर्णतः जळून खाक झाल्याने सोनवाने यांच्या परिवारावर आर्थिक संकट ओढवले आहे या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली असुन पोलीस काय तपास करणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Copyright ©