यवतमाळ सामाजिक

अस्तित्व फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ अलका विनोद कोथळे यांना वुमन अचिवर्स अवाॅर्ड तेजस्विनी पंडितच्या हस्ते प्रदान

अस्तित्व फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ अलका विनोद कोथळे यांना वुमन अचिवर्स अवाॅर्ड तेजस्विनी पंडितच्या हस्ते प्रदान.

ऑन धिस टाईम मीडियातर्फे दि.19 सप्टेंबर रोजी नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘माहेर कट्टा’ या महिलांच्या हक्काच्या व्यासपीठाचा राज्यस्तरीय शुभारंभ आणि त्यानिमित्ताने जिल्ह्यातील अस्तित्व फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ अलका विनोद कोथळे यांना सिनेअभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते प्रदान. ‘वुमन अचिवर्स’ अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला.
यवतमाळ जिल्ह्यातील अस्तित्व फाउंडेशनने समाज कार्यात अग्रेसर असुन आज पर्यंत अस्तित्व फाउंडेशनच्या माध्यमातून विवीध उपक्रम राबविण्यात आले.या अस्तित्व फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.अलका विनोद कोथळे खास करून महिलांना हक्काचे एकमेव व्यासपीठ असून अस्तित्व फाउंडेशनच्या अध्यक्षा यांनी जिल्ह्यात आजवर अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून गोरगरिबांची,वंचितांची मदत केली तसेच महिलांसाठी कला,सांस्कृतिक,शैक्षणिक व आरोग्य या संदर्भात विविध उपक्रम तसेच शिबिर राबवून महिलांना सक्षम करून त्यांना एक व्यासपीठ व विचारपीठ निर्माण केले.यामुळे आज प्रत्येक महिला आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यरत अस्तित्व फाउंडेशनने नाव कमाविले आहे. या सर्व उपक्रमांची दखल घेऊन ऑन धिस मीडिया नागपूरच्या वतीने वुमन अचिवर्स अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले या अवॉर्डमुळे सर्वत्र अस्तित्व फाऊंडेशनचे कौतुक होत आहे.

Copyright ©