यवतमाळ सामाजिक

महानुभाव पंथीय मोटर रॅली ने यवतमाळ करांचे लक्ष वेधले सायकल रॅली मध्ये ४००० सद्भभक्ताचां सहभाग

महानुभाव पंथीय मोटर रॅली ने यवतमाळ करांचे लक्ष वेधले सायकल रॅली मध्ये ४००० सद्भभक्ताचां सहभाग

महानुभाव पंथ प्रवर्तक मराठीचे आद्य जनक भगवान श्री चक्रधर स्वामी अवतरण अष्टशताब्दी वर्ष संपूर्ण भारतभर साजरा करण्यात येत आहे आज त्या निमित्त
चार हजार सद्भभक्त मोटर सायकल रॅली मध्ये सभागी झाले होते.
भगवान श्री चक्रधर स्वामींनी अकराव्या शतकात अवतार धारण करून त्या काळात जातीभेद, विषमता, स्त्रियांनाही कमी लेखणे, कर्मकांड, हिंसा, इत्यादी प्रकारचे थैमान पसरले असताना त्या काळात सर्वज्ञांनी त्यांच्याहीं विचारांना व वागणुकींना खिंडार पाडले स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार समानतेची वागणूक धर्माचा अधिकार अहिंसेचा मार्ग प्राणीमात्रांविषयी दया त्या काळात धर्मशास्त्र संपूर्ण संस्कृत भाषेत बंदिस्त होते सर्वसाधारण जीवांसाठी सर्वज्ञांनी आपल्या निरूपणातून मराठी भाषेला प्राधान्य दिले त्यामुळे मराठी भाषेला देव वाणिज्य महत्त्व प्राप्त झाले मराठी भाषा पुढे इतकी समृद्ध झाली की महानुभावांचा ग्रंथराज लीळाचरित्र हा मराठी भाषेचा आद्यग्रंथ ठरला मराठीचे आद्य कवियत्री महादंबा ही सुद्धा महानुभव पंथाची एक नव्हे तर दोन नव्हे अवघे सहा हजार पाचशे ग्रंथ संपदा ही मराठी भाषेतून समृद्ध केली आहे त्यानिमित्त कृतज्ञता सोहळा म्हणून 2022 वर्ष अष्ट शताब्दी वर्ष म्हणून साजरी करण्यात येत आहे याचे अनुषंगाने यवतमाळतील 18 सप्टेंबर 22 रोजी रविवारी यवतमाळ शहरांमध्ये भव्य दिव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते
ही मोटर सायकल रॅली अकरा वाजता श्री चक्रधर स्वामी चौक येथून श्री दत्त मंदिर आरणी रोड सर्वज्ञ चौक दाते कॉलेज दत्त चौक, शहर पोलीस स्टेशन, इंदिरा गांधी मार्केट अप्सरा टॉकीज, स्टेट बँक चौक, वाघापूर नाका श्रीकृष्ण ज्ञान मंदिर, लाठीवाला पेट्रोल पंप, जुने एसटी बस स्टँड आयुर्वेदिक कॉलेज, आणि श्रीकृष्ण सीनामाय मंदिर येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत कवीश्वर कुलभूषण,आचार्य प्रवर प.पू प. म.श्री लाडबाबा हरसुल परमपूज्य महंत आचार्य अक्काजी जामवाडी प. पू प म. रेवेराजबाबा शास्त्री दिल्ली ,श्रीकृष्ण ज्ञान मंदिर यवतमाळ, प पू. प. म.विजयराज दादा पंजाबी तर कॅबिनेट मंत्री मा. संजयभाऊ राठोड अन्न व औषधी प्रशासन मंत्री मा. यांनी श्री चक्रधर स्वामी चौकाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले या वेळी श्यामभाऊ जयस्वाल माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व मनोज जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती या वेळी संजैभाऊ राठोड यांनी शुभेछा पर मत वेक्त करताना मन्हाले की महा अनुभव असलेला महानुभाव पंथ असून माझ्या आमदारकीत विकास कामांची सुरुवात दत्तात्रय प्रंभू जांभोरा येथूनच केली तर महानुभाव पंथाच्या कोणत्याही कार्यास प्रथम प्राधान्य देऊ असे हि त्यांनी अभिवचन दिले या नंतर हि भव्य मोटर सायकल रॅलीस प पू प म.लाड बाबा हर्सूल यांनी हिरवी झेंडा दाखवून रॅली स मार्ग क्रमन चां मार्ग दर्शविला यात अनेक चौका चौकात स्वागत करण्यात आले तर दत्त चौक मध्ये माननीय आमदार मदनभाऊ येरावार यांनी स्वागत केले. या कार्यक्रमाचे संयोजक प पू.श्री धनजय दादा पंजाबी, प पू प म. विजयराज दादा पंजाबी यांनी केले तर संचालन दादारावजी उके महाराज यांनी केले आयोजन महानुभाव मंडळ यवतमाळ जिल्हा यांनी केले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©