यवतमाळ सामाजिक

वडगाव परिसरातील प्रभाग क्रं 23 मध्ये विजेचा लपंडाव,कंटाळून नागरिकांनी दिले,अधिकाऱ्याला बेशरम गुच्छा

वडगाव परिसरातील प्रभाग क्रं 23 मध्ये विजेचा लपंडाव,कंटाळून नागरिकांनी दिले,अधिकाऱ्याला बेशरम गुच्छा

मागील वर्षभरापासून वडगाव मधील दर्डा नगर,प्रवीण नगर,उज्वल नगर,विश्वास नगर,प्रजापती नगर व इतर अनेक भागात महावितरण वाघाडी तक्रार केंद्रातून अघोषित व खंडित वीज पुरवठा होत असल्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले होते,नियंत्रणाचा अभाव, कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय असल्यामुळे महावितरण च्या वीज पुरवठ्यात अनियमितता निरंतर जाणवत होती,शेवटी कंटाळून आज प्रभाग क्रमांक 23 मधील नागरिकांनी सहाय्यक अभियंता ह्यांना बेशरमगुलदस्ता , मोबाईल चार्जर व लेखी निवेदन देऊन सत्कार केला, व आपला रोष व्यक्त केला,परंतु सहाय्यक अभियंता ह्यांनी नाहक त्रास सहन करणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन,चर्चेदरम्यान वीज पुरवठ्यासंदर्भातील होणारा त्रास नक्कीच कमी होईल ह्याची ग्वाही दिली,तसेच येणाऱ्या बुधवार पासून तीन तासाचे लोड शेडिंग करून संपूर्ण वीज संयंत्रकाची व उपकरणांची देखभाल करून उर्वरित आठवडाभर अखंड वीजपुरवठा करण्याचे आश्वासन ह्यावेळी सहाय्यक अभियंता ह्यांनी उपस्थित नागरिकांना दिले,ह्यावेळी प्रलय टिप्रमवार, वसंत शेळके,रवी माहुरकर,मनीष इसाळकर,विनोद दोंदल,राजेंद्र गावंडे,राजेंद्र टेकाडे,धकाते सर,रवी कडू,गणेश यादव,कामटकर साहेब,रंगराव राऊत,महादेव काचोरे,अंजली फेंडर,संगीता टिप्रमवार, ज्योती डब्बावार, स्नेहल रेचे, इत्यादी नागरिक उपस्थित होते

Copyright ©