यवतमाळ सामाजिक

शिवराय दुर्गादेवी उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विवेक गावंडे, सचिवपदी रवि राऊत

शिवराय दुर्गादेवी उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विवेक गावंडे, सचिवपदी रवि राऊत

शहरातील शिवराय दुर्गादेवी उत्सव मंडळाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये नवरात्र उत्सव सुरळीत साजरा करण्यासाठी विविध विषयावर तसेच मंडळाचा खर्च तसेच नवरात्र नियोजन आदी विषय मांडण्यात आले. यावेळी अध्यक्षपदी विवेक गांवडे, सचिव पदी रवि राऊत, उपाध्यक्षपदी राहुल चौधरी सहसचिव पदी अभिलाष ठाकरे, कोषाध्यक्ष पदी मनोज गादेवार, सहाकोषाध्यक्ष स्वप्निल उजवने, हेमंत भोयर यांची निवड करण्यात आली.

संपूर्ण राज्यात ओळख असलेल्या यवतमाळ येथील प्रसिध्द नवरात्र उत्सवाला पंधरा दिवस शिल्लक आहे. मागील वर्षी नवरात्र उत्सव कोरोनाच्या सावटात शासनाने दिलेल्या निर्देशानुसार साजरा करण्यात आला. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने शासनाकडून उत्सवात नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यास परवानगी मिळाल्याने दुर्गा उत्सव मंडळ तयारीला लागले आहे. शहरातील दारव्हा मार्गावरील दर्डा नगर परिसरात शिवराय दुर्गा देवी उत्सव मंडळाचे यंदा ६ वे वर्ष आहे.

याकरीता मंडळाच्या वतीने सर्वसाधारण सभा घेवून कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. तसेच नवरात्र उत्सव हर्षेउल्हासात साजरा व्हावा याकरीता विविध समित्यांची नेमणुक करण्यात आली. यामध्ये सल्लागार समिती, गाबारा समिती, आगमण समिती, स्वच्छता समिती, होमपुजन समिती, इलेक्ट्रिक व मंडप समिती, बिछायत समिती, पार्कींग समिती, देवी विर्सजन समिती, आदी समिती गठित करण्यात आली.सभेला मंडळाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©