यवतमाळ शैक्षणिक

भर पावसात पालक व गावकऱ्यांची शाळेवर धडक, शाळेला ठोकले कुलूप

भर पावसात पालक व गावकऱ्यांची शाळेवर धडक, शाळेला ठोकले कुलूप

दारव्हा – तालुक्यातील चिकनी या गावामधील असलेल्या जिल्हा परिषद शाळेत पाण्याच्या गळतिची समस्या उद्भभल्याने गेल्या काही दिवसातच पालकवर्ग गावकरी तसेच युवक यांनी शाळेच्या बांधकामाची चौकशी करावी व या गळतिच्या प्रश्नावर मार्ग काढावा यासाठी शाळा व्यवस्थापन समितीकडे गेले होते. परंतु शाळा व्यवस्थापन समिती ने सरळ दुर्लक्ष केल्यामुळे या प्रकरणी जिल्हाधिकारी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन शाळेची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली. दोन दिवसात याची पाहणी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले मात्र एकही अधिकारी एकडे फिरकले नसल्याने पुन्हा पावसाचा जोर वाढला. संततधार पाण्यामुळे शाळेच्या वर्गात पाणिच पाणी झाले हे दुर्ष्य पाहताच विद्यार्थ्याचे जीव धोक्यात येत असल्याने विद्यार्थ्याना मेंढरां प्रमाणे एकाच खोलीत कोंबण्यात आले हि बाब पालकांच्या लक्षात आल्याने भर पावसात शाळेला कुलूप ठोकण्यात आले
गळतीचा हा प्रकार काही दिवसापासुन असाच सुरू आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. एवढेच नाही तर शाळेच्या इमारतीमधुन वर्गात पाणि गळते त्यासोबत जर काही सिमेंटकाँक्रेट किंवा इतरञ कोसळून विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. हा सदर प्रकार विद्यार्थ्यांचे पालक तथा गावकरी यांना कळताच भर पावसात यांनी शाळेकडे धाव घेत थेट शाळा गाठली. शाळेची अवस्था बघुन आपल्या पाल्यांचे शालेय नुकसान तर होतच आहे त्यासोबतच जिव देखील धोक्यात आहे हि बाब लक्षात येत भयभित होऊन ते संतप्त झाले. शाळा व्यवस्थापन समिती तर्फे उपाय न मिळाल्याने थेट शिक्षण अधिकारी यांना दुरध्वनी द्वारे संपर्क करून सदर प्रकार कानावर घातला. विद्यार्थ्यांच्या जीवनाचा प्रश्न असल्यामुळे व पाण्याच्या गळतीमुळे कोणा विद्यार्थ्यांवर काही नुकसानकारक बाब घडु नये याकरीता शाळेला थेट कुलूप ठोकण्यात आले.

Copyright ©