यवतमाळ सामाजिक

महानुभाव पंथीय भव्य मोटर सायकल रॅलीचे आयोजन

महानुभाव पंथीय भव्य मोटर सायकल रॅलीचे आयोजन

महानुभाव पंथा प्रवर्तक मराठीचे आद्य जनक भगवान श्री चक्रधर स्वामी अवतरण अष्टशताब्दी वर्ष संपूर्ण भारतभर साजरा करण्यात येत आहे भगवान श्री चक्रधर स्वामींनी अकराव्या शतकात अवतार धारण करून त्या काळात जातीभेद, विषमता, स्त्रियांनाही कमी लेखणे, कर्मकांड, हिंसा, इत्यादी प्रकारचे थैमान पसरले असताना त्या काळात सर्वज्ञांनी त्यांच्याहीं विचारांना व वागणुकींना खिंडार पाडले स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार समानतेची वागणूक धर्माचा अधिकार अहिंसेचा मार्ग प्राणीमात्रांविषयी दया त्या काळात धर्मशास्त्र संपूर्ण संस्कृत भाषेत बंदिस्त होते सर्वसाधारण जीवांसाठी सर्वज्ञांनी आपल्या निरूपणातून मराठी भाषेला प्राधान्य दिले त्यामुळे मराठी भाषेला देव वाणिज्य महत्त्व प्राप्त झाले मराठी भाषा पुढे इतकी समृद्ध झाली की महानुभावांचा ग्रंथराज लीळाचरित्र हा मराठी भाषेचा आद्यग्रंथ ठरला मराठीचे आद्य कवियत्री महादंबा ही सुद्धा महानुभव पंथाची एक नव्हे तर दोन नव्हे अवघे सहा हजार पाचशे ग्रंथ संपदा ही मराठी भाषेतून समृद्ध केली आहे त्यानिमित्त कृतज्ञता सोहळा म्हणून 2022 वर्ष अष्ट शताब्दी वर्ष म्हणून साजरी करण्यात येत आहे याचे अनुषंगाने यवतमाळतील 18 सप्टेंबर 22 रोजी रविवारी यवतमाळ शहरांमध्ये भव्य दिव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले आहे या रॅलीमध्ये महानुभाव पंथीय उपदेशी,सहपरिवार इष्टमित्रसह सहभागी होण्याचे आवाहन यवतमाळ जिल्हा महानुभाव मंडळ यांनी केले
ही मोटर सायकल रॅली अकरा वाजता श्री चक्रधर स्वामी चौक येथून श्री दत्त मंदिर आरणी रोड सर्वज्ञ चौक दाते कॉलेज दत्त चौक, शहर पोलीस स्टेशन, इंदिरा गांधी मार्केट अप्सरा टॉकीज, स्टेट बँक चौक, वाघापूर नाका श्रीकृष्ण ज्ञान मंदिर, लाठीवाला पेट्रोल पंप, जुने एसटी बस स्टँड आयुर्वेदिक कॉलेज, आणि श्रीकृष्ण सीनामाय मंदिर येथे या रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत परमपूज्य महंत आचार्य अक्का जी जामवाडी परमपूज्य परमहंस श्री रेवेराजबाबा शास्त्री दिल्ली ,श्रीकृष्ण ज्ञान मंदिर यवतमाळ प. पू. प. म. श्री लाडबाबाजी हरसुल तर कॅबिनेट मंत्री मा. संजय भाऊ राठोड अन्न व औषधी प्रशासन मंत्री मा. खा. भावनाताई गवळी माननीय आमदार मदनभाऊ येरावार माननीय श्यामभाऊ जयस्वाल माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत राहून मार्गदर्शन करणार, व या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून प्रस्थान करण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील समस्त भक्तांनी या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महानुभाव मंडळ यवतमाळ जिल्हा यांनी केली आहे

Copyright ©