यवतमाळ शैक्षणिक

शहीद भगतसिंग विद्यालयाचे तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

शहीद भगतसिंग विद्यालयाचे तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

तालुका प्रतिनिधी महागाव ( कस बा) :- स्थानिक श्रम साधना विकास मंडळ महागाव (कसबा ) द्वारा संचालित शहीद भगतसिंग विद्यालय महागाव (कसबा ) या शाळेतील एन एम एम एस या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले .त्यापैकी तीन विद्यार्थी एन एम एम एस शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले.त्यात शशांक प्रमोद ताजणे 93 गुण, सर्वेश दीपक ठोकळ 87गुण व कु स्वाती शंकर राठोड 83 गुण या विद्यार्थ्यांचा समावेश आहे .या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी पर्यंत दरमहा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे . परिसरात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे तसेच संस्थेचे संचालक मंडळ शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा गावकऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक केले व भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या .

Copyright ©