यवतमाळ सामाजिक

विद्यार्थ्यांचे जीवन उंचाविण्यासाठी ‘आदर्श’चे रोजगार प्रशिक्षण– बाळासाहेब मांगुळकर

विद्यार्थ्यांचे जीवन उंचाविण्यासाठी ‘आदर्श’चे रोजगार प्रशिक्षण– बाळासाहेब मांगुळकर

आदर्श बहुउद्देशीय प्रसारक महिला मंडळाचा उपक्रम. बेरोजगार युवक व युवतीचे जीवनमान उंचावण्यासाठी आदर्शानी घेतला आदर्श उपक्रम ः डॉ प्रा मिनाक्षि पानझाडे

यवतमाळ : विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी त्यांना रोजगार प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे विविध प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन माजी जि.प.उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी केले.
ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता आदर्श बहुउद्देशीय प्रसारक महिला मंडळाच्या(बेलोरा) वतीने स्थानिक गेडामनगरातील डॉ. मानेचा जुना दवाखाना येथे कार्यालयाच्या वोकेशनल ट्रेनिंगचे उद्घाटन २ सप्टेंबर रोजी पार पडले.याप्रसंगी ते बोलत होते. या ट्रेनिंग सेंटर मधून विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षण देणे सुरू करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय डांगे होते.एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प पांढरकवडाचे मयूर गेडाम, आदर्श संस्थेच्या अध्यक्षा प्रा.डॉ.मीनाक्षी सावळकर (पानझडे) प्रामुख्याने उपस्थिती होत्या. कार्यक्रमाला विविध ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध वस्तूचे बाजारीकरण व मार्केटिंग करण्याचे आश्वासन यावेळी संस्थेने दिले. संचालन व्होकेशनल ट्रेनिंगच्या संचालिका प्रा.डॉ.मीनाक्षी पानझाडे तर आभार मयूरी नेवारी यांनी मानले. यावेळी वैष्णवी कासार, साक्षी जांभुळकर, गौरी जांभुळकर, राखी कासार, पार्वती शिवणकर, देविका कीर्ती, रवीना गवते, संगीता टेकाम, कांचना थाराम, राणी पाटेकर, गुंफा बोरकर, संगीता कासार, भाग्यश्री कासार, गायत्री पडोळ, अनघा इंदोरे, सपना गजभिये, पूनम कार, तेजस्विनी महाजन, पल्लवी पाटील, अहमद सय्यद आदी प्रशिक्षणार्थ्यांसह महिलांची उपस्थिती होती.

Copyright ©