यवतमाळ सामाजिक

वाहतूक शाखा बनले वसुली पथक सर्वसामान्यांवर करतात कारवाई

वाहतूक शाखा बनले वसुली पथक सर्वसामान्यांवर करतात कारवाई

गुरुदेव युवा संघाचा आरोप

यवतमाळ प्रतिनिधी:- यवतमाळ शहरात वाहतूक पोलीस फक्त पठाणी वसुली करताना दिसत असून गेल्या काही दिवसांपासून शहरातील सर्वत्र वाहतूक कोळंबली आहे वाहतूक पोलीस सर्वसामान्य जनतेकडून पठाणी वसुली करीत असल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाने केला आहे

वाहतूक पोलिसांनी ट्रॅव्हल्स,काळी पिवळी, तसेच शहराच्या आजूबाजूच्या परिसरात वाहतूक करणाऱ्या गाडी चालकांकडून पठाणी वसुली सुरू केल्याचा आरोप सुद्धा गेडाम यांनी यावेळी केला आहे, यवतमाळ शहरात नगर परिषदेमार्फत पार्किंग पट्टे काढण्यात येते मात्र शहरात पिवळे पट्टे कुठेही दिसत नाही अशातच वाहतूक शाखेची गाडी येऊन सामान्य जनतेची गाडी घेऊन जातात व त्यांना मनमानी करीत दंड आकारल्या जाते शहरात वाहतूक पोलिसांनी त्वरित पठानी वसुली थांबवावी नगरपरिषदेने त्वरित शहरात पिवळेपट्टे आखून नागरिकांना वाहन ठेवण्याकरिता जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केली आहे

Copyright ©