यवतमाळ सामाजिक

जनतेच्या समस्या सोडविण्यात मुख्याधिकारी मडावी अपयशी नगरपरिषद हद्दीत समस्या कायमच

जनतेच्या समस्या सोडविण्यात मुख्याधिकारी मडावी अपयशी नगरपरिषद हद्दीत समस्या कायमच

हिरोगिरी करणाऱ्या मुख्याधिकारी आम्हाला नको—- गुरुदेव युवा संघाची मुख्यमंत्र्यांना मागणी

यवतमाळ प्रतिनिधी:- यवतमाळ नगर परिषदेला काही दिवसांपूर्वी नवीन मुख्याधिकारी लाभल्या सुरुवातीला आपण कर्तव्यदक्ष असल्याचं त्यांनी दाखवीत यवतमाळ शहरात धडाकेबाज प्रतिमा निर्माण करण्याचा त्यांनी बनाव केला, मात्र गोरगरिबांना मुख्याधिकारी मडावी ह्या अजूनही न्याय देत नसल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे, फक्त मुख्याधिकारी रुजू झाल्यापासून दक्षिणात्य चित्रपटातील हिरो ज्याप्रमाणे काम करतो त्या प्रकारची हिरोगिरी यवतमाळ शहरात मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी केली असल्याचा टोला सुद्धा यावे गेडाम यांनी लगावला आहे

यवतमाळ नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी सध्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना फक्त वसुली करण्यासाठी ठेवले आहे का असा सवाल सुद्धा गेडाम यांनी केला आहे, यवतमाळ शहरात विविध समस्या कायमच आहे प्रधानमंत्री आवास योजना,तलाव फईल येथील धोबीघाट दिव्यांगांना मानधन गेल्या दोन ते तीन वर्षापासून यवतमाळ शहरात फक्त दोन असलेले सिग्नल सुद्धा बंद अवस्थेत आहे वाघापूर परिसरातील कोलाम पोडावरील नागरिक अजूनही मूलभूत सुविधेपासून वंचित आहे एवढ्या भीषण समस्या कायम असताना मात्र मुख्याधिकारी मडावी ह्या शहरातील व्यापाऱ्यांना सोयीस्कर होईल अशा सायकल ट्रॅक सारख्या भ्रष्टाचारी योजना राबविताना दिसत आहे राज्यपाल मुख्यमंत्री जिल्हाधिकारी यांनी सात दिवसाच्या आत समस्या निकाली काढावे असे आदेश सुद्धा यवतमाळ नगरपरिषदेला दिले मात्र अजूनही आदेशाला मुख्याधिकारी ह्या केराची टोपली दाखवीत असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे हिरोगिरी करणाऱ्या मुख्याधिकारी आम्हाला नको आहे अशी मागणी गुरुदेव युवा संघाच्या वतीने उपविभागीय आयुक्तामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे

Copyright ©