यवतमाळ सामाजिक

*वणराजाच्या आगमनाने परिसरात दहशत*

वणराजाच्या आगमनाने परिसरात दहशत,

ग्रामीण प्रतिनिधी :अश्विनी उगले

यवतमाळ तालुक्यातील कुठे ना कुठे फेर फटका मारत असल्याने परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे या कडे वन विभागानी गंभीरतेने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे,या पूर्वी हिवरी परिसरातील अनेक जनावरांवर हल्ले करून ठार केल्याच्या घटना घडल्या असल्याने अजूनही त्या जनावरांचा मोबदला मिळाला नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहे तर या वाघाची सर्वत्र भीती निर्माण झाली आहे. पट्टे धारी वाघ यवतमाळ तालुक्यातील पांढरी आणि कोळंबी या दोन्ही गावाच्या मधात आढळला आहे हा वाघ परिसरात खुले आंम फिरत असल्याने अजूनही भीती कायमच आहे. तरी जंगलात जनावरे चारण्या करीता जात असताना गुराख्यानी जंगलाच्या दाट वस्ती कडे जनावरे चारण्यास नेऊ नये असे आवाहन हिवरी वण परिक्षेत्र अधिकारी सी. डी.नेहारे यांनी कळविले आहे जंगलात जातांना आवाज करीत जावे असे त्यांनी महत्वाच्या कामी जंगलात जाणाऱ्या ना सांगितले आहे तर कुणीही मोळी व विनाकारण जंगलात प्रवेश करू नये असे वनधिकारी सी.डी.नेहारे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Copyright ©