यवतमाळ सामाजिक

महेश नगरीत युवक – युवतींनी मिळून केली श्री ची स्थापना

महेश नगरीत युवक – युवतींनी मिळून केली श्री ची स्थापना

यवतमाळ – सेमनरी ले आऊट महेश नगरीतील युवक – युवतींनी परिसरातील बालकांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रथमच श्री महेश नगरी गणेश उत्सव मंडळ स्थापित करुन ढोल ताश्याच्या गजरात श्री च्या मुर्तिंची स्थापना केली. नियमितपणे सकाळी व संध्याकाळी 8.30 वाजता श्री ची विधिवत पुजा अर्चना करण्यात येत असून परिसरातील सर्व नागरिक व बालकांसाठी नियमितपणे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या यशस्वीतेसाठी श्रद्धा गट्टाणी, कु. हेमांशी बुंदेला, शुभम राठी, अभिनय निलावार, रोशन राठी सह परिसरातील नागरिक प्रयत्नशिल आहेत. बालकांना गणेश उत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती व्हावी व कला गुणांना वाव मिळावा यासाठी पहिल्यांदाच परिसरात श्री ची स्थापना करण्यात आली. त्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण संचारले आहे.

Copyright ©