यवतमाळ सामाजिक

दि.12 ला रूग्ण कल्याण्य समीती सफाई कामगार – परिचर यांची सभा

दि.12 ला रूग्ण कल्याण्य समीती सफाई कामगार – परिचर यांची सभा

यवतमाळ :- आयटक रूग्ण कल्याण समीती सफाई कामगार / परिचर संघटना जिल्हा‌ यवतमाळची सभा दि.12 सप्टेंबरला 2022 ला 11 श्रमशक्ती भवन आयुर्वेदिक दवाखाना जवळ यवतमाळ येथे आयोजीत केली आहे तसेच शासनाचे लक्ष वेधण्या करीता रूग्ण कल्याण समीती अंतर्गत काम करणारे सफाई कामगार / परिचर यांच्या प्रलंबित मागण्या व समस्यांना घेऊन त्याच दिवसी मा.जिल्हाधिकारी यांचे मार्फत मा.आरोग्य मंत्री , महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई व मा.संचालक , राष्ट्रीय आरोग्य अभीयान , राज्य आरोग्य सोसायटी , मुंबई यांना निवेदन पाठवण्यात येईल सध्या ह्या सफाई कामगार / परिचरांना फक्त शंभर रूपये रोज दिल्या जाते त्यात ह्या जिवघेण्या महागाईत कुंटबाचा उदरनिर्वाह भागत नाही त्यांना सतत उपासमार सोसावी लागत आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्या करीता आयटकच्या नेतृत्वात निवेदन देण्यात येणार आहे. मागण्या :- रूग्ण कल्याण समीती अंतर्गत कार्यरत सफाई कामगार / परिचर यांना किमान वेतन दरमहा रू.१८०००/- द्या , सामाजीक सुरक्षा लागु करा, ह्या मुख्य मागण्यासह इतरही मागण्यांना घेऊन निवेदन देण्यात येणार आहे तरी यवतमाळ जिल्ह्यातील रूग्ण कल्याण समीती अंतर्गत कार्यरत सर्व सफाई कामगार / परिचर यांनी मोठ्या संखेने वेळेवर उपस्थीत राहावे असे आवाहन गोदावरी पडघने,अनंता पाचपोर , अमोल मनवर, अरविंद गडदे, अक्षय इंगळे ,आकाश वानखडे,आतिष बावणे ,किरण पाईकराव , पुष्पाबाई दिवेकर , प्रशांत हिवराळे , रामसिंग आंद्रपाली , विनोद नेहारे, श्रीकांत वायदंडे , संजय चवरे, रमेश बलखंडे , आकाश खेडेकर कविश कुबडे , दिवाकर नागपुरे
यांनी केले आहे

Copyright ©