यवतमाळ सामाजिक

सावधान आपल्या प्राण्यांची वेळीच काळजी घ्या -डॉ.गोपाल चव्हाण

सावधान आपल्या प्राण्यांची वेळीच काळजी घ्या
-डॉ.गोपाल चव्हाण

लम्पी स्कीन डिसिज
मागील दोन वर्षांपासून थैमान घातलेल्या जनावरामधील विषाणूजन्य आजार म्हणजे लम्पी स्कीन डिसिज (LSD) या आजाराचा आतापण गुजरात आणि आणि महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात जनावरांना संसर्ग होत असताना दिसुन येत आहे. हा रोग नविन प्रकारचा नसून ह्याचे पार्श्वभूमी ही जुनी आहे.या बाबत जाणून घ्या,
*रोगाचा परिचय आणि पूर्व इतिहास

लम्पी स्कीन डिसीज हा रोग विसव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळापासून ते विसाव्या शतकाच्या उत्तराधातापर्यत फक्त आफ्रिकेत आढळत होता. त्यानंतर मात्र या रोगाने सभोवतालच्या देशामध्ये शिरकाव केला. इ.स. २०१३ नंतर हा रोग सर्वदूर पसरु लागला. आज घडीला हा रोग आशिया आणि युरोपिय देशात पसरलेला आढळत आहे. महाराष्ट्रामध्ये ह्या रोगाची नोंद मार्च-२०२० मध्ये गडचिरोली या जिल्हयात आहे.
-रोगाची कारणे आणि प्रादुर्भाव-
लम्पी स्कीन हा रोग विषाणूजन्य चर्मरोग म्हणजे साथीचा रोग आहे. या रोगाचे विषाणू हे देवी विषाणू गटातील आहे (क्याप्री पॉक्स प्रवर्ग) हा आजार मुख्यत्वे गायी-व म्हशी मध्ये आढळतो. हा आजार देशी वंशाच्या गायी पेक्षा विदेशी आणि संकरित गायी मध्ये या रोगबाधेचे प्रमाण अधिक आहे. लहान वासरात हा रोग प्रौढ जनावराच्या तुलनेत जास्त वेगाने प्रसारीत होतो.
हवामानातील बदलाचा परिणाम या रोगावर होताना दिसते. म्हणजे जर हवामान उष्ण आणि दमट असेल तर रोगप्रसार आधिक प्रमानात होते. हा रोग कोरड्या वातावरणात म्हणजेच उन्हाळ्यात आधिक प्रमाणात आढळतो. हिवाळ्यात कमी प्रमाणात आढळतो. या आजाराचे मरतुकीचे प्रमाण कमी असले तरि त्याचा परिणाम उत्पादन क्षमतेवर होते. उदा. दूध उत्पादनमध्ये घट होणे, नवजात शिशूला सुद्धा ह्या रोगाचे संक्रमण होतो व शारिरीक कमजोरी सुध्दा येऊ शकते, या आजारामुळे त्वचा खराब झालेली जनावरे खुप विकृप दिसतात.
–रोग प्रसार व प्रसार माध्यम–
१) या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावनाऱ्या किटकापासून होतो. उदा.गोचिड पिसवे, डास, चिलटे.इ.
२) निरोगी आणि बाधित जनावरांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्काने या आजाराचा संसर्ग होतो.
३)या विषाणूचा संक्रमण झाल्यानंतर हे विषानू शरीरातील विविध ग्रंथी मध्ये प्रवेश करून तोंडातील लाळ, नाकातील स्त्राव, डोळ्यांतील पानी तसेच रक्ताद्वारे चारा व पान्यामध्ये येतात. निरोगी जनावरांना या आजाराची लागण होते.
या आजाराची लागन जर गाभण गायी- म्हशीना तर गर्भपात होऊ शकतो किंवा रोगस्त वारसांचा जन्म होतो.
— लक्षणे
१) या आजारामुळे बाधित झालेल्या जनावरामध्ये हा आजार दोन ते पाच आठवड्यापर्यंत दिसुन येतो.
२) यामूळे जनावरांना खूप जास्त प्रमाण ताप येतो.
३)नाकावाटे पाणी गळणे
४) चारा खाणे, पाणी पिणे बंद होने किंवा कमी होने
५) लसिका ग्रंथीना म्हणजे मानेखाली सुज येणे,
६) शरीरातील विविध भागावर जसे कान, नाक, पाय, मायांग, कास एकून संपूर्न शरिरावर १०-५० मिमि व्यासाच्या गाठी येतात.
७)डोळ्यात चिपडे पडणे आणि तोंडातील व्रणामुळे जनावरास चारा चघळण्यास त्रास होणे.
८) पायावर सुज येऊन जनावरे लंगडणे इ.
— रोग नियंत्रण
१) बाधीत जनावरांची तपासणी करणाऱ्या पशुवैदयकानी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. या जनावराना स्पर्श करनाऱ्या प्रत्येक डॉक्टराने आणि पशुपालकाने अल्कोहोल युक्त सॉनिटायजरचा वापर करावा
२) तपासणीदरम्यान वापरण्यात आलेले साहित्य निर्जंतुकीकरण करून घ्यावे
३) प्रत्येक उपचारादरम्यान सिरिंज आणि निडल बदलून घ्यावा.
४) कीटकनाशक चा वापर करून जनावराच्या अंगावर व गोठ्यामध्ये फवारणी करावी.
५) जनावरावरिल बाह्य परजिवीचा नायनाट करण्यासाठी संसर्गास रोखण्यासाठी पशुवैद्यकाकडून आपल्या जनावरास आयवरमेक्तीनची इंजेक्शन घ्यावी.
६) या साथीच्या रोगाच्या काळात जनावराची खरेदी-विक्री टाळावी.
७)जनावराच्या अंगावर झालेल्या पुटकुळ्या मध्ये तरपेनटाइन द्रावण टाकावे जेणे करन त्यात आळ्या पडू नये.
८) या आजारामध्ये मरतुकीचे प्रमाण कमी आहे. परंतु यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या जनावरास 8 फुट खड्यात पुरावा
९) या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी पशुपालकाने घ्यावयाची काळजी निरोगी जनावरास बाधित जनावरापासून वेगळे ठेवावे.
१०) खाण्यात स्वच्छ व क्षारयुक्त खनिजाचा वापर करावा.
११) प्रत्येक जनावरास पाजण्यात येणारा पानी बदलुन घ्यावा
१२) गोठयातील गोचिड, पिसे, डास, माशाच्या नायनाट करावा.
१३) गावामध्ये कीटक नाशकाची फवारणी करावी.
अशा प्रकारची लक्षणे आपल्या पशुमध्ये आढळल्यास तर पशुवैदयकाकडून विलंब न करता उपचार करून घ्यावा. असे आव्हाहन,डॉ. गोपाल उल्हास चव्हाण पशुधन विकास अधिकारी,
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -१, हिवरी यांनी केले आहे या वेळी,राम मांगीलाल चव्हान पशुधन व्यवस्थापन व दुग्धव्यवसाय हे होते.

Copyright ©