यवतमाळ सामाजिक

रास्त धान्य दुकान चालकाचा मनमानी कारभार थांबवा

रास्त धान्य दुकान चालकाचा मनमानी कारभार थांबवा

गुरुदेव युवा संघाच्या महिला धडकल्या तहसील कार्यालयावर

जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांच्या संपत्तीच्या चौकशीची केली मागणी

यवतमाळ प्रतिनिधी:- शासनाकडून गरिबांना मिळणाऱ्या धान्याची सध्या स्वस्त धान्य दुकानदार परस्पर विक्री करत असून गरिबांना धान्यापासून वंचित ठेवल्या जात आहे तसेच कोणाला गहू तर कोणाला तांदूळ देऊन कधी दुकान सुरू तर कधी दुकान बंद ठेवून मनमानी कारभार सुरू आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना देऊन सुद्धा यवतमाळ शहरात एकही स्वस्त धान्य दुकानदाराने धान्याची माहिती देणारे फलक लावले नाही गरीबाचे हक्काचे धान्य गरिबांना मिळावे म्हणून आज गुरुदेव युवा संघाच्या शेकडो महिला तहसील कार्यालयात धडकल्या तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांच्या चौकशीची मागणी सुद्धा या महिलेंनी यावेळी केली आहे

गेल्या अनेक दिवसांपासून शासनाकडून गरिबांना मिळणारा धान्य बाजारात विक्री होताना दिसत आहे अशातच पोलिसांनी जीवाची बाजी लावून गरिबांना मिळणारा हक्काचं धान्य बाजारपेठेत विक्री करताना जप्त केलं आहे,मात्र लक्ष्मी दर्शनाच्या हवासापोटी पुरवठा विभागाने चिरीमिरी घेऊन तुटपुंजी कारवाई करीत असल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाच्या महिलांनी केला आहे ,जुना उमरसरा परिसरात असलेल्या एका सरकारी रास्त दुकानदाराने तर गेल्या अनेक वर्षापासून मनमानी कारभार सुरू केला आहे त्यांच्या अनेक तक्रारी होऊनही पुरवठा विभाग बघायची भूमिका घेत आहे अशातच मनमानी कारभार करीत कधी दुकान उघडतो तर कधी दुकान उघडत नाही तसेच जवळच्या लोकांना धान्य देतो तर बाकीच्यांना अपमानास्पद वागणूक देऊन परत करतो असा आरोप सुद्धा यावेळी या महिलांनी केला आहे, असाच काहीचा प्रकार शहरातील पाटीपुरा परिसरात असलेल्या आंबेडकर चौक येथे सुद्धा बघायला मिळतो,येथे आलेल्या नागरिकांना येथील दुकानदार छोटी गुजरीत जा इथे मिळणार नाही असे म्हणून नेहमी गोर गोरगरिबांना परत पाठवतो हा सगळा प्रकार जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार व तालुका पुरवठा निरीक्षक चांदणी शिवणकर यांना माहित आहे मात्र हे कारवाई करीत नसल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाच्या महिलेंनी केला आहे त्यामुळे आज संतप्त झालेल्या गुरुदेव युवा संघाच्या महिला पदाधिकारी तहसील कार्यालयात धडकल्या जुना उमरसरा परिसर आंबेडकर चौक छोटी गुजरी येथील स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करा व जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी महिलांनी केली आहे येत्या आठ दिवसात कारवाई न झाल्यास हा सर्व प्रकार आयुक्तासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारात जाणार असल्याचं यावेळी गुरुदेव युवा संघाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे

Copyright ©