यवतमाळ सामाजिक

किशोर तिवारी आज आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या भेटी घेणार

किशोर तिवारी आज आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या भेटी घेणार

मारेगाव तालुक्यात आज दौरा कार्यक्रम

महाराष्ट्र सरकारने शेतकरी मिशनची पुनर्रचना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने शेतकरी मिशनला विशेष बाब म्हणून निवडणूक आदर्श आचारसंहीते पासुन दौरे करण्यास व आढावा घेण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान मागील ६ दिवसात यवतमाळ जिल्ह्यातील एकट्या मारेगाव तालुक्यात ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक बातम्या आल्यानंतर या भागात किशोर तिवारी यांचा दौरा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या ७ शेतकरी आत्महत्यांची कारणे व हे आत्महत्या सत्र बंद होण्यासाठी तात्काळ उपाय योजना माननीय पंतप्रधान भारत सरकार तसेच माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विशेष अहवाल देण्यासाठी हा दौरा आयोजीत करण्यात आला आहे. दुपारी २ वाजता म्हैसदोडका येथील आत्महत्या करणाऱ्या शेतकरी सतीश वासुदेव बोथले यांच्या घरी भेट
दुपारी २.३० वाजता नरसाळा येथील आत्महत्या करणाऱ्या शेतकरी गजानन नारायण मुसळे यांच्या घरी भेट,
दुपारी ३ वाजता शिवणी धोबे येथील आत्महत्या करणाऱ्या शेतकरी हरिदास सूर्यभान टोनपे यांच्या घरी भेट,
संध्याकाळी ३.३० वाजता रामेश्वर कुंभा येथील आत्महत्या करणाऱ्या शेतकरी सचिन सुभाष बोढेकर यांच्या घरी भेट,
संध्याकाळी ४ वाजता गदाजी बोरी येथील आत्महत्या करणाऱ्या शेतकरी पुंडलिक मारोती रुयारकर यांच्या घरी भेट, संध्याकाळी ४.३० वाजता दांडगाव येथील आत्महत्या करणाऱ्या शेतकरी तोताराम अंगत चिंचुलकर यांचे घरी भेट,
संध्याकाळी ५ वाजता वेगाव येथील आत्महत्या ग्रस्त शेतकरी अविनाश जीवन मेश्राम यांच्या घरी भेट व
रात्री पांढरकवडा येथे मुक्काम असा दौरा आयोजित आहे.

Copyright ©