यवतमाळ सामाजिक

विश्वनाथ शेटे ह्यांचे घरी पर्यावरण पुरक बाप्पांचा देखावा

विश्वनाथ शेटे ह्यांचे घरी पर्यावरण पुरक बाप्पांचा देखावा

(परिसरात हेमाडपंथी देखावा आकर्षणाचे केंद्र)
कोरोनाचे मळभ दूर करून चैतन्यरुपी सुमनांचा सुगंध पसरविण्यासाठी यवतमाळ नगरीत गणरायाचे आगमन झाले आहे. तब्बल दोन वर्षांनंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात ‘श्रीं’चे जंगी स्वागत करण्यासाठी अवघी यवतमाळ नगरी सज्ज झाली आहे. शहरातील संपूर्ण वातावरण ‘गणेश’मय झाले आहे.अशातच
भाद्रपद महिन्यात येणारे गणराय आनंद, उत्साह, उल्हासाचे प्रतीक व ज्ञानाची देवता होय. वातावरणात आशेचा किरण पसरविणारा एक उत्साहावर्धक सण म्हणजेच गणेशाचे आगमण ह्या दहा दिवसाच्या काळात गणरायाबद्दल भक्तांच्या मनात असणारे प्रेमचं जणू घराघरातुन व्यक्त केले जाते आकर्षक सजावट प्रत्येक घरात पाहायला मिळते, असाच संपुर्ण इकोफ्रेंडली देखावा यवतमाळ, रूप नगर अमराई येथील विश्वनाथ शंकरराव शेटे, ह्यांचे घरी जंगलामध्ये हेमाडपंथी मंदिरा समोर बाल गणेश, आणि सोबत मुशकराज व प्राण्यांना सह विराजमान हा संपुर्ण इकोफ्रेंडली देखावा साकारण्यात आला आहे,सोबतच फिरता मुशक हा देखावा परिसरामध्ये आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.प्रत्येक वर्षीच शेटे परिवार एकापेक्षा एक सरस देखाव्यातुन संदेश देत असतो मागील वर्षीच्या देखाव्याला सुध्दा शिवराय गणेश मंडळ द्वारा घेण्यात आलेल्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता,यावर्षीही सादर केलेल्या देखाव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Copyright ©