यवतमाळ सामाजिक

बिगर 7/12 शेतकरी संघटनेचा आक्रोश मोर्चाचा ईशारा भाई जगदीश इंगळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बिगर 7/12 शेतकरी संघटनेचा आक्रोश मोर्चाचा ईशारा
भाई जगदीश इंगळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

यवतमाळ – बिगर 7/12 शेतकरी संघटना प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे, प्रदेश अध्यक्ष नंदु पाटील काठोळे, कार्याध्यक्ष गजानन वानखडे यांनी एक निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले असून यात त्यांनी ठेंबी नाका ते ठाणे येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानापर्यंत बिगर शेतकरी संघटनेचा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा ईशारा दिला आहे. सर्वांसाठी घरे या धोरणाची अंमलबजावणी करावी, ग्रामीण भागातील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी तत्कालीन मंत्री महसुल मंत्री व विद्यमान कॅबिनेट मंत्री यांच्या पुढाकाराने संघटनेच्या वतीने दाखल केलेल्या निवेदनाची दखल घेऊन बहुतांश ग्रामीण भागातील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करुन घ्यावी असा शासन निर्णय निर्गमित करावा. अतिक्रमणाचे प्रस्ताव नियमानुकूल करण्यासाठी उपविभागीय स्तरावर शक्ती प्रदत्त समिती गठीत करुन स्थानिक स्वराज्य संस्थेचे सचिव यांच्या मार्फत गटविकास अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करुन नियमानुकूल करण्यासाठी बेघर लोकांनी गावाठाण भुखंडावर निवाससाठी केलेले अतिक्रमण नियमानुकूल होवून प्रधानमंत्री आवास योजना जागेचा मालकी हक्क मिळावा त्याच धर्तीवर विद्यमान शिंदे, फडणवीस सरकारने सर्वांसाठी शेती 2024 धोरणाची घोषणा करुन महसुल व वनविभागाच्या पडीत जमीनीवर अतिक्रमण केले आहे ते नियमानुकूल करावे अशी मागणी केली असून या मागणीच्या पुर्ततेसाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे. काशिबा रणमले सदस्य, आनंदा रणमले सदस्य, रामधन जाधव सदस्य, संतोष जाधव सदस्य, रोहिदास चव्हाण सदस्य, गणेश उत्तम चव्हाण सदस्य बिगर 7/12 शेतकरी संघटना यांनी हे निवेदन जिलाधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्र्याकडे पाठविले आहे.

Copyright ©