यवतमाळ शैक्षणिक

सुसंस्कार विद्या मंदिराच्या चिमुकल्यांनी साकारले पर्यावरण पुरक बाप्पा

सुसंस्कार विद्या मंदिराच्या चिमुकल्यांनी साकारले पर्यावरण पुरक बाप्पा

यवतमाळः सुपासारखे कान…लांब सोंड…गोलाकार पोट आणि डोक्यावर आकर्षक मुकूट तयार करून बघता बघता विद्यार्थ्यांनी गणपतीच्या पर्यावरणपूरक मूर्ती साकारल्या. मातीच्या गोळ्याला आकार देत चिमुकल्या हातांनी बनवलेल्या या मूर्तींमुळे पालकांना पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचा संदेश मिळाला.

सुसंस्कार विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांनी गणरायाच्या आगमनाचे औचित्य साधून गणेशाच्या मूर्ती स्वहस्ते बनविल्या. भाद्रपद महिन्यात येणारे गणराय आनंद, उत्साह, उल्हासाचे प्रतीक व ज्ञानाची देवता होय. सुसंस्कार विद्या मंदिर येथील प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी एक स्तुत्य उपक्रम शाळेने राबविला. गणेशाच्या मूर्ती तयार करणे व गणरायाची चित्रे रेखाटणे या उपक्रमात प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

चिमुकल्यांनी आपल्या लहानग्या हातानी गणेशाच्या मूर्ती साकारल्या व गणेशाची चित्रे रेखाटली. या मूर्ती व चित्रांच्या माध्यमाने त्यांनी गणरायाबद्दल त्यांच्या मनात असणारे प्रेमचं जणू व्यक्त केले आहे. मूर्ती साकारतानां त्यांच्या मनात निर्माण झालेला उत्साह, मूर्ती पूर्णत्वास आल्यावर प्रसन्न दिसणारा त्यांचा चेहरा हे पाहून पालकही सुखावले आहे. विद्यार्थ्यांना आपल्या गणेश मूर्ती व गणरायाची रेखाटलेली चित्रे शाळेमध्येच तयार केली. अशा वेळी शाळेद्वारा राबविला गेलेला हा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांना अतिशय आनंद प्रदान करणारा ठरला. कल्पकतेचा वापर करून, विविध साधनांच्या साह्याने चिमुकल्यांनी तयार केलेल्या मूर्ती बघताना पालकवर्ग आणि शिक्षकवर्गही सुखावला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उषा कोचे म्हणाल्या ,
गणपती ही विद्येची देवता आहे. याशिवाय असूरांचा संहार करणारी गणेशाची रूपे आहेत. दोन्ही रूपे मूर्तीमध्ये हुबेहुब साकारता येतील, यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला हवे. ज्ञान आणि कारागिरीला कधीही पूर्णविराम नसतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत सतत सराव करणे गरजेचे आहे.’ ‘गणेशोत्सवामध्ये बाजारातून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती खरेदी केल्या जातात. त्या मूर्तींचे विसर्जन केल्याने जलप्रदूषण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने आम्ही कार्यशाळा आयोजित केली होती. यामुळे पर्यावरणाची हानी टाळण्यास मदतच होईल.’
शाळेद्वारे अतिशय स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल शाळेचे सचिव श्री. के. संजय व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषा कोचे यांनी शाळेतील प्राथमिक विभागातील सर्व शिक्षकांचे व उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आपल्या कल्पनाविश्वात रममाण होऊन अत्यंत अप्रतिम मूर्ती व चित्रे रेखाटल्या बद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या उपक्रमाच्या यशस्वीते करिता प्राथमिक विभाच्या सर्व शिक्षक वृंदाचे सहकार्य लाभले.

Copyright ©