यवतमाळ सामाजिक

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुर्ण ताकदीने लढविणार ! भाई अमन

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुर्ण ताकदीने लढविणार ! भाई अमन

आम आदमी पार्टीची शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक संपन्न

यवतमाळ प्रतिनिधी -: आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच आम आदमी पार्टीची रणनीती,पार्टीची ध्येयधोरणे तळागाळात नेऊन जनतेच्या कामातून पक्ष वाढीसाठी व पक्ष संघटना मजबूत करणे,सदस्य नोंदणी करणे तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या अडी-अडचणी समजून घेण्यासाठी व पार्टीच्या संघटनात्मक बांधणीसाठी
यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आम आदमी पार्टीचे भाई अमन यांचे नेतृत्वात आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक वसंतराव ढोके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये पार्टीच्या मागील वाटचालीवर पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले,तर नव्याने आम आदमी पार्टीत भाई अमन यांच्या प्रवेशाने पार्टी संपूर्ण विदर्भात अधिक जोमाने उभी करणार असून यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची हमी भाई अमन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.गेल्या दहा वर्षापासून आम आदमी पार्टीमध्ये तन-मन-धनाने पार्टी वाढणाऱ्या पदाधिकाऱ्यांना कुठेही डावलल्या जाणार असून त्यांना योग्य सन्मान दिल्या जाईल तसेच आम आदमी पार्टीच्या शाखा प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाई अमन यांनी सांगितले.
या आढावा बैठकीला यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.यामध्ये जिल्हा संयोजक वसंतराव ढोके, ॲड.मनीष माहुलकर,विलास वाडे, निखिल दुरके,राधा जाधव,शेख जलील शेख फरीद, आशिष ठाकरे,शिवदास कोल्हे, कवीश्वर पेंदोर,चंदन मजेठिया, गुणवंत इंदुरकर,अतुल झोपाटे,डॉ. गणेश नाईक,हसन शेख,नाजिम शेख, निजार गिलाणी,संजय ढोले,दादाजी पोटे,बंडू महानुर,निलेश पचारे,रमेश पाटील,गुलाब कन्नलवार,संजय जाधव,सय्यद साकिब सय्यद महेबूब,सय्यद सलमान तिलोकचंद जैन,ज्योती पारधी सुनंदा साखरकर,आकाश चमेडिया,ॲड.अमित पवार,ओमप्रकाश डोहळे, प्रेमदास चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©