यवतमाळ सामाजिक

गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को – ऑप सोसायटी लि. नांदेड चे संस्थापक खासदार. हेमंत पाटील यांचा नियोजनातून नेर पोलीस स्टेशन ला बॅरिकेड्स भेट

गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को – ऑप सोसायटी लि. नांदेड चे संस्थापक खासदार. हेमंत पाटील यांचा नियोजनातून नेर पोलीस स्टेशन ला बॅरिकेड्स भेट

गोदावरी अर्बन नेर शाखेच्या वतीने गणपती उत्सवानिमित्त सामाजिक उपक्रमांतर्गत गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को – ऑप सोसायटी लि. नांदेड चे संस्थापक खासदार. हेमंत पाटील , संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई पाटील यांचे मार्गदर्शन आणि व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांचे नियोजनातून
नेहमीच ग्राहकांच्या सेवेसाठी तत्परतेने कार्य करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. ग्राहकांना नवनवीन सेवा उपलब्ध करून देत आधुनिकतेकडे वाटचाल करत अल्पावधीतच गोदावरी अर्बनने १६५० कोटी ठेवींचा उच्चांक गाठत बँकिंग क्षेत्रात स्वतःची नविन ओळख निर्माण केली आहे. गोदावरी अर्बन वेळोवेळी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित असते.
गोदावरी अर्बन , नेर शाखेच्या वतीने गणपती उत्सवाचे औचित्य साधून शहरातील वाहतूक व्यवस्था, गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी मदत व्हावी या हेतूने नेर पोलिस स्टेशन ला बॅरिकेड्स भेट देत सामाजिक बांधिलकी जोपासली.. या कार्यक्रमाप्रसंगी नेर शहराचे पोलिस निरीक्षक .रामकृष्ण जाधव संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक .रवी इंगळे , शाखा अधिकारी अमित निकम , समस्त कर्मचारी, दैनिक व आवर्त ठेव प्रतिनिधीवृंद उपस्थित होते.

Copyright ©